Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल, भाजपची सत्तावापसी की काँग्रेस मारणार बाजी? JD(S) किंगमेकर ठरणार? आज फैसला

खास करुन सामना सत्ताधारी भाजप (BJP), काँग्रेस (Congress ) आणि JD(S) पक्षासोबत आहे. ज्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Karnataka Assembly Election Result

Karnataka Assembly Election Result 2022: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 ( Assembly Election Results 2023) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (13 मे) सकाळी आठ वाजता सुरु होत आहे. खास करुन सामना सत्ताधारी भाजप (BJP), काँग्रेस (Congress ) आणि जेडी(एस) 9JD(S) पक्षासोबत आहे. सध्या देशभरात ईव्हीएम (EVM) द्वारे मतदान होत असल्याने त्याची मतमोजणीही वेगाने होते. परिणामी जनतेचा कौल कोणाला याची फार काळ वाट पाहावी लागत नाही. परिणामी कर्नाटक विधानसभा निवडणुक निकालाची उत्सुकताही फार काळ लांबणार नाही. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही तासात म्हणजेच दुपारी एक ते दोनपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होऊ शकते. मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल्सनी आपले अंदाज व्यक्त केले आहेत. काही एक्झिट पोल्सनी काँग्रेस यंदा भाजपच्या सत्तेला खिंडार पाडेल असे म्हटले आहे. तर, दुसऱ्या बाजूला काही पोल्सनी भाजप काटावर पास होऊन सत्तेत राहील असे म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये त्रिशंकू स्थितीर राहिल असेही काही एक्झिट पोल्सना वाटते. त्यामुळे एक्झिट पोल्सचे ठोकताले किती खरे आणि किती खोटे याबाबतही स्पष्टता निकालानंतर येणार आहे.

दरम्यान, कर्नाटक निवडणूक 2023 मध्ये तीन प्रमुख दावेदार आहेत. त्यात भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) साठी दावे अधिक केले जात आहेत. अपवाद वगळता पाठिमागील 38 वर्षे भाजप कर्टाटकमध्ये सत्तेत आहे. या 38 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसने जंग जंग पछाडले आहे. कर्नाटकमध्ये साधारण 1985 पासून भाजप सत्तेत आहे. या राज्यात मतदारांनी साचलेपणाचा (एन्टीइन्कंबंन्सी) फटका भाजपला कधीही बसू दिला नाही. परंतू, आता परिस्थीती काहीशी वेगळी आहे. कॉंग्रेस सत्ताविरोधी लाटेवर, बेरोजगारी आणि महागाईवर स्वार होऊ पाहत आहे. JD(S), तथापि, 2018 च्या कर्नाटक निवडणुकीप्रमाणे पुन्हा किंगमेकरची भूमिका बजावू पाहत आहे. त्यामुळे जनतेचा कौल कोणाला याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. (हेही वाचा, Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल TV9 Kannada Live Streaming येथे पाहा)

दरम्यान, कर्नाटक निवडणूक 2023 साठी मतदान 10 मे रोजी झाले. ज्याची मतमोजणी 13 मे म्हणजेच आज रोजी सकाळी 8 वाजता सुरू होत आहे. एकूण 224 मतदारसंघासाठी मतदान पार पडले आहे. या सर्व 224 विधानसभा मतदारसंघांचे निकाल भारतीय निवडणूक आयोगामार्फत सर्व जागांची मतमोजणी झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल.