Job Creation By Modi Government: मोदी सरकारच्या काळात विक्रमी नोकऱ्या निर्माण झाल्या; अर्थतज्ज्ञ Surjit Bhalla यांचा दावा
भल्ला यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात सरासरीच्या आधारावर विक्रमी नोकऱ्या निर्माण होत आहेत. भल्ला पुढे म्हणाले की, 2004 ते 2013 (यूपीए सरकारच्या कार्यकाळात) सर्वात कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आणि तेव्हाच 'रोजगारी वाढ' ही संज्ञा अस्तित्वात आली.
Job Creation By Modi Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये (PM Modi Government) अभूतपूर्व नोकऱ्या निर्माण होत आहेत. गेल्या 7-8 वर्षात हा आकडा एक कोटीच्या वर गेला आहे. भारतातील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) माजी कार्यकारी संचालक सुरजित भल्ला (Economist Surjit Bhalla) यांनी रविवारी ही माहिती दिली. भल्ला यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात सरासरीच्या आधारावर विक्रमी नोकऱ्या निर्माण होत आहेत. भल्ला पुढे म्हणाले की, 2004 ते 2013 (यूपीए सरकारच्या कार्यकाळात) सर्वात कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आणि तेव्हाच 'रोजगारी वाढ' ही संज्ञा अस्तित्वात आली.
ते म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात रोजगार निर्मिती उच्च पातळीवर झाली आहे. ‘भारतीय इतिहासात याआधी कधीच सरासरीच्या आधारावर इतक्या नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत’. पीटीआयला दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीत त्यांनी ही बाब नमूद केली.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) माजी सदस्य भल्ला यांनी असे प्रतिपादन केले की, अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण झाल्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालावर ते प्रतिक्रिया देत होते. हा अहवाल सांगतो की, 2022 मध्ये भारतातील एकूण बेरोजगार लोकसंख्येमध्ये ‘बेरोजगार तरुणांचा’ वाटा सुमारे 83 टक्के होता. (हेही वाचा: निवडणुकीच्या धामधुमीत ईडीची मोठी छापेमारी; झारखंडमधील मंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरून शोधून काढला नोटांचा डोंगर)
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने ते परतले. भारतातील थेट परकीय गुंतवणूक (FDI) मंदावल्याबद्दल भल्ला म्हणाले की, भारतातील एफडीआय कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारचे नवीन धोरण हे होय. यामध्ये असे म्हटले आहे की, गुंतवणुकीशी संबंधित कोणताही विवाद असल्यास, तो भारतातच सोडवावा लागेल. भल्ला यांच्या मते, परदेशी गुंतवणूकदार त्यांची थेट गुंतवणूक वाढवत नाहीत, तर त्यांची पोर्टफोलिओ गुंतवणूक वाढवत आहेत. ते म्हणाले, ‘मला आशा आहे की नवीन सरकार कोणाचे असेल ते या धोरणाचा पुनर्विचार करेल.’ यासह सांख्यिकीय संभाव्यतेच्या आधारे सत्ताधारी भाजपला स्वबळावर 330-350 जागा मिळण्याची शक्यता भल्ला यांनी व्यक्त केली.
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2024 01:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

