JNU मध्ये हल्ला आम्ही केला! हिंदू रक्षक दलाचे कार्यकर्ता पिंकी चौधरी यांची कबुली (Watch Video)
हिंदू रक्षक दलाचे (Hindu Rakshak Dal) अधिकारी पिंकी चौधरी (Pinki Choudhari) यांनी एक व्हिडीओ पोस्ट असून यामध्ये जेएनयू मधील हल्ला हा आम्हीच केला अशी कबुली देण्यात आली आहे.
दिल्लीतील (Delhi) बहुचर्चित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री अचानक काही अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला तब्बल 48 तास होत आले तरीही हा हल्ला कोणी केला किंवा का केला याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र एका संघटनेने स्वतः या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत व्हिडीओ पोस्ट केला आहे. हिंदू रक्षक दलाचे (Hindu Rakshak Dal) अधिकारी पिंकी चौधरी (Pinki Choudhari) यांचा हा व्हिडीओ असून यामध्ये जेएनयू मधील हल्ला हा आम्हीच केला अशी कबुली देण्यात आली आहे, जेएनयूमध्ये सुरू असलेले आंदोलन आम्ही खपवून घेणार नाही. हे विद्यार्थी आपल्याच देशात खातात, शिकतात. आणि देशाविरुद्धच काम करतात यापुढे जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला अशीच कारवाई सहन करावी लागेल असा इशारा सुद्धा चौधरी यांनी दिला आहे.
जेएनयू हिंसाचार: मुंबई मध्ये आंदोलक गेटवे ऑफ इंडिया वरून आझाद मैदानात स्थलांतरित; पोलिसांची कारवाई
पिंकी चौधरी यांनी व्हिडीओ मध्ये, या विद्यापीठातून हिंदू धर्माच्या विरुद्ध केली जाणारी विधाने ऐकून शेवटी हा हल्ला करण्यात आला आणि जर का हे धर्मविरोधी बोलणे थांबले नाही तर अशीच कारवाई पुन्हा करू असे चौधरी यांनी म्हंटले आहे. जेएनयूमध्ये सुरू असलेले आंदोलन आम्ही खपवून घेणार नाही. हे विद्यार्थी आपल्याच देशात खातात, शिकतात. आणि देशाविरुद्धच काम करतात यापुढे जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला अशीच कारवाई सहन करावी लागेल असे म्हंटले आहे, तसेच मागील काही वर्षांपासून जेएनयू हा कम्युनिस्टांचा अड्डा बनला आहे आणि आम्ही हे अड्डे सहन करणार नाही असेही विधान पिंकी चौधरी यांनी केले आहे.
पहा हा व्हिडीओ
दरम्यान, पिंकी चौधरी यांचा इतका थेट व्हिडीओ येऊन त्यात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारूनही पोलिसांनी किंवा अधिकृत व्यक्तीने या व्हिडिओवर भाष्य केलेले नाही त्यामुळेच हा दावा कितपत खरा आहे आणि व्हिडीओचा नेमका अर्थ काय हे स्पष्ट झालेले नाही. पिंकी चौधरी व हिंदू रक्षा दलाची मागील कारकीर्द पाहता एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर त्यांनी दगडफेक करून तुरुंगवास भोगला होता.
दुसरीकडे जेएनयू प्रकरणात दिली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी हा हल्ला दोन विद्यार्थी गटातील अंतर्गत वादातून झाला असल्याचे म्हंटले आहे, यात एकूण 34 जण जखमी झाले असून याचा रीतसर तपास केला जाईल असे मीडियाला सांगितले आहे.