WhatsApp ला हेरगिरी प्रकरणी केंद्र सरकारने विचारला जबाब; 4 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आवाहन
अशी माहिती केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली आहे.
इस्त्राईल स्पायवेअर पिगासच्या (Pegasus) माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात आल्याचं व्हॉट्सअॅपने (WhatsApp) मान्य केले आहे. आता NSO ग्रुप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या हेरगिरीच्या प्रकरणात केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपकडे उत्तर मागितलं आहे. केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला 4 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली आहे. यावेळेस सरकारने अफवांवर विश्वास ठेवू नका. भारतीयांची माहिती सुरक्षित आहे. व्हॉट्सअॅप विरुद्ध संबंधित प्रकरणी विचारणा करून कठोर कारवाई केली जाणार आहे.
ANI Tweet
प्राप्त माहितीनुसार, हॅकर्सकडून एक स्पायवेअर तयार करण्यात आलं आहे. त्याच्यामाध्यमातून व्हॉट्सअॅपचा डेटा वापरला जातो. हे स्पायवेअर एका इस्त्राईल सॉफ्टवेअर कंपनीकडून बनवण्यात आलं आहे. NSO ग्रुपकडून Pegasus टूल बनवण्यात आलं आहे. त्याच्या माधयमातून Google Drive किंवा iCloud द्वारा माहिती हॅक केली जात होती. सुमारे 1400 मोबाईलमध्ये मालवेअर आल्याने त्याच्यामधील माहिती चोरली गेली. व्हॉट्सअॅपचे सुमारे 1.5 अब्ज युजर्स आहेत .
युजर्सना व्हीडिओ कॉल करून त्याच्या माध्यमातून मालवेअर्सना प्रवेश मिळाला. पीगॅसस या सॉफ्टवेअरमुळे फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून माहिती चोरण्यात आली आहे.