How To Exchange Rs 2000 Notes: जाणून घ्या 2000 च्या नोटा बँकेतून कशा बदलून घेऊ शकता, मर्यादा आणि अंतिम मुदतही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 नोटा या 30 सप्टेंबरपर्यंत डिपॉझिट किंवा बदलुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

2000 Rs Notes

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) 2000 च्या चलनी नोटा वितरण न करण्याचे आदेश बँकाना देण्यात आले आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा चलनात वापरण्यात येणार असल्याचे देखील या सर्कुलरमध्ये सांगण्यात आले आहे. याचा अर्थ तुम्ही 2000 च्या नोटा तुम्ही व्यवहारासाठी अजूनही वापरु शकतात.जर तुम्हाला तुमची 2000 ची नोट बदलुन घ्यायची असेल तर तुम्ही आरबीआयच्या अधिकृत बँकेकडून किंवा पोस्ट ऑफिसमधून या बदलून घेऊ शकतात. एका दिवसाला तुम्ही 20,000 पर्यंतच्या नोटा बदलून घेऊ शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी 2 हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केलाय. परंतु 2 हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहणार आहेत. दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा बाजारात आल्या. 500 ची नोट बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

कशा  बदलून घेणार 2000 च्या नोटा?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 नोटा या 30 सप्टेंबरपर्यंत डिपॉझिट किंवा बदलुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिक आपल्या जवळ असणाऱ्या नोटा एका दिवसात 10 नोटा आपल्या बँकेतून बदलून घेऊ शकतात किंवा ते डिपॉझिट करु शकतात. बँकेकडून यावेळी ग्राहकांना सर्वोत्तपरी सहाय्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2000 च्या नोटा चलनातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. त्या आपल्याला दिलेल्या मुदतीपर्यंत जमा करता येणार आहेत. 2016 मध्ये 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने 2019 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे.