Helicopter Service in Bengaluru: बेंगळुरू शहरातील ट्रॅफिकवर मात करण्यासाठी सुरु होत आहे हेलिकॉप्टर सेवा; जाणून घ्या मार्ग व शुल्क
याआधी कंपनीने महाराष्ट्रात आपले पहिले उड्डाण मुंबई-शिर्डी आणि पुणे-शिर्डी दरम्यान सुरू केले. पुणे ते शिर्डी प्रवास करण्यासाठी फक्त 60 मिनिटे लागतात. नंतर कर्नाटक (कूर्ग, हम्पी आणि काबिनी) आणि गोवा येथे नियोजित सीट-दर-सीट हेलिकॉप्टर उड्डाणे वाढवली.
अर्बन एअर मोबिलिटी कंपनी फ्लाय ब्लेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Fly Blade India P. Ltd.) त्यांचा प्रवासाचा अंदाज बदलत आहे. कंपनी देशातील काही शहरांमध्ये हेलिकॉप्टर सेवा पुरवत आहे. बंगळुरूसारख्या (Bengaluru) शहरात जिथे रहदारी ही मोठी डोकेदुखी आहे, तिथे कंपनी आपली सेवा सुरू करत आहे. फ्लाय ब्लेडला या ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये एयरबस (Airbus) कडून H125 हेलिकॉप्टर मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 10 ऑक्टोबरपासून बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एचएएल (HAL) दरम्यान प्रति सीट 3,250 रुपये दराने हेलिकॉप्टर सेवा सुरू करेल. कंपनी नंतर व्हाईटफिल्ड आणि इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी आणखी मार्ग सुरू करेल. व्यवस्थापकीय संचालक अमित दत्ता, म्हणाले, ‘गुजरातच्या गिफ्ट सिटीमधील पूर्ण मालकीच्या उपकंपनीने एअरबससह काही हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली आहे. हेलिकॉप्टरची आसनक्षमता 5/6 असेल. या ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये पहिले हेलिकॉप्टर वितरित होण्याची अपेक्षा आहे.’
याआधी कंपनीने महाराष्ट्रात आपले पहिले उड्डाण मुंबई-शिर्डी आणि पुणे-शिर्डी दरम्यान सुरू केले. पुणे ते शिर्डी प्रवास करण्यासाठी फक्त 60 मिनिटे लागतात. नंतर कर्नाटक (कूर्ग, हम्पी आणि काबिनी) आणि गोवा येथे नियोजित सीट-दर-सीट हेलिकॉप्टर उड्डाणे वाढवली. तसेच त्यांनी बेड-टू-बेड एअर मेडव्हॅक सेवा आणि चार्टर्ड विमान सेवाही सुरू केली. कंपनी पुढील 24 महिन्यांत आपले नेटवर्क वाढवून 10 राज्यांमध्ये सेवा देण्याची योजना आखत आहे. (हेही वाचा: CSMT Mumbai: सीएसएमटी मुंबईसह देशभरातील तीन प्रमुख रेल्वे स्टेशन्सचा होणार कायापालट, केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्विकासाठी मंजूरी)
बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एचएएल विमानतळादरम्यान प्रस्तावित हेलिकॉप्टर सेवेबद्दल अधिकाऱ्याने सांगितले की, दरवर्षी सुमारे 40 दशलक्ष लोक विमानतळाला भेट देतात आणि त्यापैकी बहुतेक टॅक्सीद्वारे येतात ज्याचे शुल्क सुमारे 2,000 रुपये आहे. टॅक्सी वाहतुकीचे काही टक्के ट्राफिक हेलिकॉप्टर सेवेत रूपांतर झाल्यास, महसूल वाढवण्याची मोठी क्षमता असेल. बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. हे हेलिकॉप्टर 3,250 रुपयांमध्ये 12 मिनिटांत विमानतळावर पोहोचू शकेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)