Heat Wave Guideline: राज्यात उन्हाचा पारा वाढला, नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या विशेष सूचना जारी
मुंबई-ठाण्यासह राज्यभरात उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहेत. गेले काही दिवस मुंबईच्या तापमानाने रविवारी पुन्हा उच्चांकी पातळी गाठली आहे.
राज्यात ग्रामीण भागासह शहरी भागातही उष्णतेची लाट (Heat Wave) धडकली आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यभरात उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहेत. गेले काही दिवस मुंबईच्या तापमानाने रविवारी पुन्हा उच्चांकी पातळी गाठली आहे. पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हे करावे -
- जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही थोड्या वेळाने पाणी प्या
- प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
- ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेय प्यावे.
- टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
- तुमचे डोके झाकून ठेवाः थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपीचा वापर करा
- उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
- हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.
- दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे. थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.
हे टाळावे -
- उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळा
- दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा.
- अनवाणी बाहेर जाऊ नका.
- अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा.
- हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement