Pregnant Elephant Death in Kerala: आरोग्य मंत्रालयाचे मिडिया सल्लागार आणि एका पत्रकाराने ट्विटद्वारे कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय 'अमजत अली आणि थमिम शेख' यांची नावे आरोपी म्हणून केली घोषित; नंतर डिलीट केली पोस्ट
त्यानंतर काही वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली.
केरळच्या पलक्कड (Palakkad ) जिल्ह्यात झालेल्या 15 वर्षाच्या गर्भवती हत्तीणीच्या (Pregnant Elephant) मृत्यूने संपूर्ण देश हळहळला. तिचा मृत्यू हा दुर्दैवी मृत्यू नसून तिची हत्या करण्यात आली अशी प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून उमटत आहे. या प्रकरणातील एकाला अटक करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, विल्सन असे त्याचे नाव आहे. असे असताना देखील कोणतीही अधिकृत माहिती नसताना अन्य दोन व्यक्तींची नावे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विशेष करुन त्यात ही नावे ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर ही नावे व्हायरल होत होती. या दोघांचा कुठेही उल्लेख झाला नव्हता ना ही त्यांच्या अटकेची बातमी होती. मुख्य बाब म्हणजे ही माहिती दिली होती आरोग्य मंत्रालयाचे मिडिया सल्लागार (Media Advisor to the Union Minister of State for Health and Family Welfare) आणि एका पत्रकाराने (Journalist).
आरोग्य मंत्रालयाचे मिडिया सल्लागार अमर प्रसाद रेड्डी (Amar Prasad Reddy) यांनी ट्विटच्या माध्यमातून अमजत अली (Amzath Ali) आणि थमिम शेख (Thamim Shaikh) यांना गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूस जबाबदार धरले होते. त्यानंतर काही वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली.
त्यानंतर त्यांनी याच्यावर स्पष्टीकरण देत एक ट्विट केले, ज्यात त्यांनी म्हटले की "#JusticeForElephants मी @CMOKerala यांचे आभार मानतो ज्यांनी पलक्कड येथील गर्भवती हत्तीणीच्या प्रकरणाविरोधात कारवाई केली. माझ्या याआधीची पोस्ट ही केवळ या हत्तीणीची क्रूर पद्धतीने केलेली हत्या याबद्दल होती. ती नक्कीच कोणत्याही व्यक्ती वा समूहासाठी नव्हती. त्यामुळे मी पारदर्शक पद्धतीने या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणी करतो."
हेदेखील वाचा- Pregnant Elephant Dies Update: पलक्कड मध्ये गर्भवती हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी एकाला अटक, वनमंत्री के राजू यांनी दिली माहिती
अमर प्रसाद रेड्डी यांचे ट्विट
तर दुसरीकडे पत्रकार दिपक चौरसिया (Deepak Chaurasia) यांनी देखील अशाच आशयाचे ट्विट केले होते. ज्यात त्यांनी अमजत अली आणि थमिम शेख यांना हत्तीणीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असे म्हटले होते. त्यांनतर त्यांनीही ती पोस्ट डिलीट केले. तत्पूर्वी अनेकांनी हे ट्विट रिट्वीट तसेच लाईक केले होते.
दिपक चौरसिया ट्विट:
या प्रकरणी आतापर्यंत केवळ एकाला अटक करण्यात आली असून विल्सन अशी त्या संशयिताची ओळख सांगण्यात येत आहे. ही माहिती DD News Malayalam यांनी दिली आहे. तर सार्वजनिक प्रसारमाध्यमांद्वारे आणखी दोघांना पकडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची नावे अजून उघड केली नाही.
त्यामुळे नेटिजन्सनी अशा कोणत्याही बातमीची शहानिशा न करता आणि अधिकृत माहिती न मिळवता पोस्ट करु नये अशी विनंती करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात केवळ एकाला अटक करण्यात आली आहे.