प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी 'ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशन'ची स्थापना; बेकायदेशीर कारखाने व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चाप बसवणार

महाराष्ट्रातील वाढते औद्योगिक प्रदूषण, बेकायदेशीर कारखाने आणि अवैध वृक्षतोडीविरोधात लढा देण्यासाठी 'ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था राज्यभरात काम करणार आहे.

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी 'ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशन'ची स्थापना; बेकायदेशीर कारखाने व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चाप बसवणार

महाराष्ट्रात वेगाने वाढणारे औद्योगिक प्रदूषण, बेकायदेशीर कारखाने आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी 'ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशन' या राज्यस्तरीय स्वयंसेवी संस्थेची (NGO) स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक नेते अनिल महाजन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मुंबईतील फोर्ट परिसरात मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर असणार आहे.

प्रामाणिकांना पाठबळ, भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका

संस्थेची भूमिका स्पष्ट करताना अध्यक्ष अनिल महाजन यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरणाऱ्या आणि नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक उद्योजकांना संस्था पूर्ण पाठिंबा देईल. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील (MPCB) प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी संस्था ठामपणे उभी राहील. मात्र, प्रदूषक कंपन्यांशी संगनमत करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि बेजबाबदार उद्योगांवर पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल.

तांत्रिक तज्ज्ञ आणि कायदेशीर लढा

फाउंडेशनच्या कामात निवृत्त MPCB अधिकारी सल्लागार मंडळात मार्गदर्शन करतील. प्रत्यक्ष पाहणी, पाणी-हवेचे नमुने तपासणे आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यासाठी पर्यावरण अभियंते, रासायनिक तज्ज्ञ, पर्यावरण शास्त्रज्ञ आणि कायदेतज्ज्ञांची एक मजबूत टीम कार्यरत राहणार आहे. हे पुरावे शासन, पर्यावरण मंत्रालय आणि राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) सादर करून थेट कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल.

राज्यभरातील 'हॉटस्पॉट'वर विशेष लक्ष

तारापूर, डोंबिवली, अंबरनाथ, तळोजा, महाड, इचलकरंजी, वाळूज आणि चंद्रपूर यांसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक पट्ट्यांवर संस्था विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. नद्यांमध्ये प्रक्रिया न करता सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी, हवेतील विषारी धूर, बेकायदेशीर जीन्स वॉशिंग युनिट्स, अवैध वृक्षतोड आणि सार्वजनिक बागांमधील अस्वच्छता रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवली जाईल.

नागरिकांना सहभागाचे आवाहन

आपल्या परिसरातील बेकायदेशीर प्रदूषण किंवा वृक्षतोडीबाबत नागरिकांनी gi.pollutioncontrol@gmail.com या ईमेलवर अथवा 8788964050 या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2026 10:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).