Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; पहा आजचा सोन्या-चांदीचा दर काय?
मागील महिन्यात गोल्ड ईटीएस मध्ये गुंतवणूक कमी झाल्याचं पहायला मिळालं आहे.
भारतामध्ये सोन्याच्या दरामध्ये चढ उतार कायम आहे. येत्या काही महिन्यात देशात हिंदू धर्मियांच्या सणांची रेलचेल, व्रत वैकल्यं सुरू होणार आहेत. दरम्यान मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आता आठवड्याच्या सुरूवातीला पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आज सोमवारी (21 जून) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर (Gold rates) 0.40 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.MCX वर चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी घसरला. मागील आठवडयामध्ये गुरूवारी, शुक्रवारी सोन्याचा दर अंदाजे 1600 रूपयांनी कमी झाले होते. दरम्यान जून महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचा दरात 2500 रूपयांची घट नोंदवण्यात आली आहे.
भारतामध्ये सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील परिणाम होत असतो. मागील महिन्यात गोल्ड ईटीएस मध्ये गुंतवणूक कमी झाल्याचं पहायला मिळालं आहे. गोल्ड ईटीएस मध्ये गुंतवणूक 57% कमी झाली आहे. ही गुंतवणूक 288 कोटी इतकी कमी झाली आहे.
आज रिटेल सेलिंग दरांनुसार, फाईन गोल्डचा दर 4702 प्रति ग्राम आहे. तर 22 कॅरेट 4542 प्रति ग्राम आहे. चांदीचा दर प्रतिकिलो 67,635 रूपये इतका आहे.
पहा दर
दरम्यान काही दिवसांपूर्वीपासून आता सोन्याचे दागिने हॉलग्राम करणं बंधनकारक केले आहेत. या नियमानुसार, 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याचे दागिने आता हॉलमार्क (BIS Hallmark)असतील. हॉलग्राम केलेलेच दागिने विकता येणार आहे. दागिने हॉलग्राम नसतील तर संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावासाची शिक्षा होणार आहे.