Flights Delayed At IGI: दिल्लीत धुक्यामुळे विमानसेवा ठप्प; 100 हून अधिक उड्डाणं रद्द

यामध्ये 15 विदेशात जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. तर इतर भारतामध्येच प्रवास करणार आहेत.

Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवा ठप्प झाली होती. आयजीआय (IGI Airport) विमानतळावर याचा मोठा परिणाम झाला. दाट धुक्यामुळे (Dense Fog Engulfs) दृष्यमानता फारच कमी झाली होती. स्पष्टपणे काहीही दिसत नव्हते. यामुळे आज तब्बल 110 विमान उड्डाणांना विलंब झाला आहे. वैमानिकांना पुढील दृष्य स्पष्टपणे दिसावे, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र, या प्रयत्नांचा वैमानिकांना याचा मोठा फायदा झालेला नाही. धुक्यामुळे जवळपास 18 विमानांच्या उड्डाणांना जास्त कालावधी लागला आहे. शिवाय, वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या आठ फ्लाईट्स इतर ठिकाणी वळवण्यात आल्या आहेत. यामध्ये सात फ्लाईट्स जयपूरकडे तर एक अहमदाबादकडे नेण्यात आली आहे. (हेही वाचा -Delhi Airport Issues Advisory: दाट धुके, दृश्यमानता शून्यावर, विमान उड्डाणावर मर्यादा, दिल्ली विमानतळाकडून मार्गदर्शक सूचना जारी)

सध्या जवळपास 125 विमानांमधील प्रवाशांना प्रवास करण्यास विलंब झाला आहे. यामध्ये 15 विदेशात जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. तर इतर भारतामध्येच प्रवास करणार आहेत.  आज  सकाळी दृष्यमानता कमी झाल्यामुळे पटना, अहमदाबाद, पुणे, जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये जाणाऱ्या विमान उड्डाणांना तासंतास विलंब होत आहे.

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर दाट धुके पडल्यानंतर उपाययोजना राबविण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत. एखाद्या विमानतळावर दाट धुक्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास याला 'कॅटगिरी 3' म्हणून ओळखले जाते.