INS Vikrant: भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज देशाच्या नौदलात सामील

भारतचं पहिल स्वदेशी बनावटीचं विमानवाहू जहाज INS विक्रांत हे आजपासून भारताच्या नौदलात कार्यान्वित होणार आहे.

व्यवसाय, अन्नधान्य, आरोग्यसेवा अशा विविध बाबतीत भारत आत्मनिर्भर आहेच पण संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारत आज एक महत्वाचं पाऊल टाकणार आहे. आजचा दिवस संपूर्ण देशासाठी मोठा आहे कारण भारतचं पहिल स्वदेशी बनावटीचं विमानवाहू जहाज INS विक्रांत हे आजपासून भारताच्या नौदलात कार्यान्वित होणार आहे. ही भारतासाठी केवळ आनंदाची नाही तर अभिमानाची बाब आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा INS विक्रांत या स्वदेशी नौकेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याच बरोबर पंतप्रधान मोदी नौदलाच्या नव्या निशानाचं देखील अनावरम करणार आहेत.

 

INS विक्रांत ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी विमानवाहू नौका आहे. भारतापूर्वी केवळ पाच देशांनी 40 हजार टनांपेक्षा जास्त वजनाची विमानवाहू युद्धनौका तयार केली आहे. INS विक्रांतचे वजन 45,000 टन आहे. INS विक्रांत बनवण्याची सुरुवात २००९ मध्ये झाली असली तरी ही बलाढ्य नौका साकारण्यासाठी १२ वर्ष म्हणजे एक तप पूर्ण करण्या एवढा कालावधी लागला असं म्हणायला हरकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुद्द ट्वीट करत INS विक्रांतच्या उद्घाटनाबाबत माहिती दिली आहे. (हे ही वाचा:- India GDP Rate: भारतीय अर्थव्यवस्थेने घेतला वेग; 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत 13.5 टक्के राहिला आर्थिक विकास दर)

 

INS विक्रांत नौकेच्या बेसिक चाचण्या नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आल्या. यानंतर जवळपास दोन वर्षांनंतर जुलै 2022 मध्ये त्याच्या समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या. चाचणी पूर्ण झाल्यानंतर जुलै 2022 मध्ये कोचीन शिपयार्डने ते नौदलाकडे सुपूर्द केले. INS विक्रांत साकारण्यासाठी 20 हजार कोटी खर्च आला. या जहाजाचे वेगवेगळे भाग 18 राज्यांमध्ये बनवले आहेत. या विमानवाहू नौकेत 76% स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हे जहाज एखाद्या टाउनशिपइतका वीज पुरवठा करु शकते.