Earthquake in Delhi: पाऊस, वादळी वातावरणानंतर भुकंपाने हादरली दिल्ली; 3.5 रिश्टर स्केलचे धक्के

या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. दिल्लीच्या आसपासच्या परिसरात गाजियाबाद येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake (Photo Credits: Pixabay)

Delhi Earthquake on 10th May: देशाची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये आज (10 मे) दुपारी भुकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. दिल्लीच्या जवळील गाजियाबाद (Ghaziabad) येथे भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीतील वातावरण काही दिवसांपासून बिघडले आहे. आज देखील वातावरणात अचानक बदल दिसून आला. पाऊस, धुळीचे वादळ याने दिल्ली शहराला हादरवले. त्यानंतर आलेल्या भूकंपाने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. यापूर्वी 12-13 एप्रिल रोजी राजधानी दिल्ली भुकंपाने हादरली होती. सलग दोन दिवस दिल्ली-एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 12 एप्रिल रोजी झालेल्या भुकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान भुकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.

आज सकाळी दिल्लीतील वातावरण अत्यंत सौम्य होते. परंतु, दुपारनंतर वातावरणात अचानक बदल दिसून आला. वातावरण ढगाळ होऊन काही वेळाने पाऊस सुरु झाला. अंदाजे ताशी 60 किमीच्या वेगाने हवा सुरु झाली आणि वादळाचे वातावरण निर्माण झाले. सध्या देशात कोरोना व्हायरसचे संकट आहे. त्यात वातावरणात होणारे अनेक बदल याला दिल्लीच्या नागरिकांना सामोरे जावे लागत असून भुकंपासारखी नैसर्गिक आपत्ती नागरिकांची चिंता वाढवत आहे.

ANI Tweet:

यापूर्वी शनिवारी (9 मे) गुजरात राज्याच्या काही भागात भुकंपाचे हादरे जाणवले होते. हा भुकंप 4.0 तीव्रतेचा होता. हे धक्के राज्यातील जूनागढ, पोरबंदर आणि गीर सोमनाथ या भागात जाणवले होते. मात्र सुदैवाने त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.



संबंधित बातम्या