प्रजासत्ताक दिनाचे मोदी सरकारचे आमंत्रण डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले

नवी दिल्लीत 26 जानेवारी 2018 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे.

PM मोदी आणि राष्ट्रपति डोनल्ड ट्रंप (File Photo)

नवी दिल्लीत 26 जानेवारी 2019 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ट्रम्प यांच्या कार्यालयातून आलेल्या एका पत्रात कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल ट्रम्प यांनी खेद व्यक्त केला आहे. तसंच ट्रम्प भारतात येण्याबद्दल विचार करत असल्याचीही चर्चा आहे. तसे झाल्यास ट्रम्प यांचा भारत दौरा दोन्ही राष्ट्रांमधील संबंध मजबूत करण्यास मदत करेल.

भारताने एप्रिलमध्ये ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन 2019 च्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. मोदी आणि ट्रम्प यांची 2017 मध्ये वाशिंग्टन येथे पहिली भेट झाली होती. त्यानंतर बहुपक्षीय बैठकांमध्ये दोघांच्याही भेटी होत राहिल्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलिकडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून एक पाठवण्यात आले. त्यात कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यामुळे ट्रम्प यांनी खेद व्यक्त केला आहे. खरंतर काही मुद्द्यांवर भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावपूर्व झाले आहेत. याचे प्रमुख कारणे म्हणजे रशियासोबतचे भारताचे सुरक्षा संबंध आणि अमेरिकेचे बंधन झुगारुन इराणमधून केलेली इंधनाची आयात.

भारताने अमेरिकेची बंधने झुगारुन अलिकडेच एस-400 सुपरसोनिक एयर मिसाइल डिफेंस सिस्टम प्रणालीच्या खरेदीसाठी रशियाची हातमिळवणी केली. एस-400 ट्रायम्फ वायू रक्षा प्रणाली एकाचवेळी 36 ठिकाणी अॅटॅक करु शकतील आणि एकवेळी 72 मिसाईल सोडू शकतील. खरंतर अमेरिका याच्या विरुद्ध आहे आणि त्यांनी इतर देशांवरही ही प्रणाली खरेदी न करण्याची निर्बंधे घातली होती. मात्र ती बंधने झुगारुन भारताने रशियासोबत करार केला.

त्याचबरोबर अमेरिकेचे सुरक्षामंत्री पोंपियो यांनी अमेरिकेच्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी भारत 4 नोव्हेंबर पर्यंत इराणसोबतचा करार मोडेल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र भारताने त्यास साफ नकार दिला आणि इंधनाच्या गरजेनुसार काम करु असे स्पष्टपणे सांगितले.