फनी चक्रीवादळ 'दक्षिण बंगाल'च्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
फनी चक्रीवादळ हळूहळू गंभीर रुप धारण करत असून लवकरच ते पश्चिम बंगालच्या आठ जिल्ह्यात धडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
फनी चक्रीवादळ हळूहळू गंभीर रुप धारण करत असून लवकरच ते पश्चिम बंगालच्या आठ जिल्ह्यात धडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून किनारपट्टीवरील रहिवाशांना घरं खाली करण्याचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे कच्च्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तर पक्क्या घरांना काही प्रमाणात वादळाचा फटका बसू शकतो.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या वादळाचा परिणाम घरं, शेती, झाडे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. पुढील 12 तासांत उत्तर-पश्चिम दिशेने हे वादळ घोंगावण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व-पश्चिम मेदिनीपुर, झारग्राम, कोलकाता, उत्तर आणि दक्षिण 24 परगना, हावडा आणि हुगळी जिल्हात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
वादळाच्या शक्यतेमुळे प्रशासनाकडूनही सुरक्षितेतच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलली जात आहेत. स्थानिक रहिवाशांबरोबच पर्यटकांनाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.