लहान मुलांच्या औषधांबाबत सरकारचा मोठा निर्णय; Chlorpheniramine-Phenylephrine FDC वर निर्बंध

सरकारने क्लोरफेनिरामाइन मॅलिएट (Chlorpheniramine Maleate) आणि फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराईड (Phenylephrine Hydrochloride) असलेल्या सर्व निश्चित मात्रा औषध मिश्रण [(Fixed Dose Combinations (FDCs)] च्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध घातले आहेत.

Child Cough Syrup

देशातील बालकांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्याच्या दृष्टीने सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारने क्लोरफेनिरामाइन मॅलिएट (Chlorpheniramine Maleate) आणि फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराईड (Phenylephrine Hydrochloride) असलेल्या सर्व निश्चित मात्रा औषध मिश्रण [(Fixed Dose Combinations (FDCs)] च्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध घातले आहेत. तसेच, चार वर्षांखालील मुलांना ही औषधे देण्यात येऊ नयेत अशा स्पष्ट इशारावजा सूचना त्यावर नमूद करणे अनिवार्य केले आहे.

यापूर्वी, 15  एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे [S.O. 1717(E)], सरकारने क्लोरफेनिरामाइन  मॅलिएट   (Chlorpheniramine Maleate) आणि  फेनिलेफ्रिन   हायड्रोक्लोराइड (Phenylephrine Hydrochloride) यांचा समावेश असलेल्या विशिष्ट 'एफडीसी' (FDCs) वर, वयाशी निगडीत विशिष्ट इशाऱ्याच्या अटींसह राहून निर्बंध घातले होते. नव्याने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत ही अट या दोन घटकांचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या औषधी मिश्रणांना लागू करण्यात आली आहे.

तज्ज्ञ समिति आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळ (DTAB) यांच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारच्या औषध  मिश्रणांचा वापर चार वर्षांखालील मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो; आणि शिवाय या औषधांऐवजी अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत, असं मत सरकारने नोंदवले आहे.

उत्पादकांना निर्देश देण्यात आले आहेत की, "चार वर्षांखालील मुलांसाठी ठराविक मात्रेचे मिश्रण वापरले जाऊ नये " असा स्पष्ट इशारा या औषध प्रकारांशी संबंधित लेबलवर, पाकिटावर आणि आनुषंगिक साहित्यावर स्पष्टपणे प्रदर्शित करावा  असे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत.

सार्वजनिक आरोग्याच्या हितास्तव 'औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940  च्या कलम 26-A अन्वये ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, ती अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून लागू झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement