वकिल हनुमान प्रसाद अग्रवाल यांनी केला भगवान रामचंद्राचे वंशज असल्याचा दावा; सर्वोच्च न्यायालयात दाखल केले शपथपत्र
छत्तीसगड उच्च न्यायालयाचे वकील हनुमान प्रसाद अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रभू रामचंद्राचे वंशज असल्याचे दावा करणारे शपथपत्र सादर केले आहे.
छत्तीसगड उच्च न्यायालयाचे वकील हनुमान प्रसाद अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रभू रामचंद्राचे वंशज असल्याचे दावा करणारे शपथपत्र सादर केले आहे. हनुमान अग्रवाल हे बिलासपूर येथील निवासी असून त्यांनी केलेल्या दाव्यानुसार प्रभू रामचंद्राचा मुलगा कुश यांच्या वंशावळीतील वल्लभ देव यांचे पुत्र महाराजा अग्रसेन सूर्यवंशी क्षत्रिय होते. इंटरनेटवर काही काही पुरावे गोळा केल्यानंतर आपण न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे असा दावादेखील त्यांनी केला आहे.
हनुमान अग्रवाल हे छत्तीसगडमध्ये राहतात. ते भगवान राम यांचा मुलगा कुश च्या 34 व्या पीढीत जन्म झालेल्या अग्रवाल समाजातील पूर्वज महाराजा अग्रसेन यांचा जन्म झाला. अग्रवाल समाजाचे सारे लोक अग्रसेनचा मुलगा आणि रामाचा वंशज आहे. महाराज अग्रसेन यांचा इतिहास 5189 वर्ष जुना आहे. त्यांनी रामजन्म भूमीचा वाद आणि त्यामध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
ANI Tweet
मागील काही दिवसांपासून रामजन्मभूमीवरून वाद सुरू आहे. सध्या सर्वोच्च न्यायलयात त्याबाबत सुनावणी सुरू आहे. अयोद्धा वादामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पाच सदस्यांच्या कमिटीने भगवान राम यांच्या वंशातील कुणी अयोद्धेमध्ये राहते का? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर हनुमान प्रसाद अग्रवाल यांच्याआधी जयपूर आणि मेवाड राजघराण्याशिवाय अनेकांनी राम यांचे वंशज असल्याचा दावा केला आहे.