CAA Protest: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून 'बिहार बंद' ची हाक; हिंसाचारात अनेक पोलीस-नागरिक जखमी
बिहार मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरुद्ध हिंसाचाराच्या रुपात विरोध केला जात आहे, ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत बिहार बंद (Bihar Band) ठेवण्याची हाक देण्यात आली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (Citizenship Amendment Act) देशभरात संमिश्र प्रतिक्रया समोर येत आहेत, काही ठिकाणी समर्थनार्थ तर कुठे निषेधार्थ मोर्चे काढून हा मुद्दा सद्य घडीचा सर्वात ज्वलंत विषय बनला आहे, याच मुद्द्यावरून बिहार (Bihar) मधील वातावरण काही दिवसांपासून पेटलेले आहे, उत्तर प्रदेशात CAA च्या निषेधार्थ सुरु असणरय्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने आतापर्यंत 18 जणांचा नाहक बळी गेल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे तर आज सकाळीच आरजेडी (RJD) च्या कार्यकर्त्याचा रिक्षांची तोडफोड करतानाचा एक व्हिडीओ देखील पाहायला मिळत होता. या हिंसाचारात अनेक नागरिक आणि पोलीस जखमी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत बिहार बंद (Bihar Band) ठेवण्याची हाक देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशात हा निषेध आणि आंदोलनाचा पवित्रा सुरुवातीपासूनच हिंसक दिसून येत होता, ज्यामुळे पोलीस दलाला सज्ज करून सुव्यवस्था राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला होता, मात्र काही ठिकाणी पोलिसांवरच हल्ले चढवल्याने वातावरण तापले आहे. आंदोलनकर्तानी आतापर्यंत एकूण 6 पोलिसांना गंभीर मारहाण केली असून त्यांच्यावर पटना येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एकाची प्रकृती नाजूक असल्याचे देखील समोर आले आहे. (CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनात हिंसाचार केल्याप्रकरणी यूपी मधील मृतांचा आकडा 15 वर पोहचला)
दरम्यान, कोतवाली भागात ही आंदोलने अधिक तीव्र होत असल्याने न्याय दंडाधिकाऱ्याकडून 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच काल पासून तब्बल 250 जणांच्या विरुद्ध पोलीसांकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे.