कोयना धरणाचे पाणी सोडल्याने उत्तर कर्नाटकात आपत्तीजन्य स्थिती; कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र
महाराष्ट्रातील कोयना धरण भागातही याच प्रकारे पाण्याचा विसर्ग करून कृष्णेच्या पात्रात पाणी सोडण्यात आले होते मात्र या अतिरिक्त पाण्यामुळे उत्तर कर्नाटकात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
राज्यभर पावसाच्या थैमानानंतर अनेक धरणे 100 टक्के भरली आहेत, त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी लाखो क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. महाराष्ट्रातील कोयना धरण (Koyna Dam) भागातही याच प्रकारे पाण्याचा विसर्ग करून कृष्णेच्या (Krishna River) पात्रात पाणी सोडण्यात आले होते मात्र या अतिरिक्त पाण्यामुळे उत्तर कर्नाटकात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तर कर्नाटक भागातील अनेक ठिकाणांमध्ये आपतीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा (B S Yediyurappa) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात येडियुरप्पा यांनी फडणवीसांना परिस्थीतीची कल्पना देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे.
ANI ट्विट
प्राप्त माहितीनुसार , काल कोयना धरणातून महाराष्ट्र व लगतच्या परिसरात २ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे उत्तर कर्णात्ताक मधील शेकडो गावांवर संकट कोसळले होते. यातही जोरदार पावसामुळे परिस्थिती आणखीनच वाईट झाली होती. यामध्ये बेळगाव, बागलकोट, विजयपूरम रायचूर, यादगीर या पाच जिल्ह्यांची सर्वात अधिक हानी झाली होती. आतपर्यंत याठिकाणी कोणतीही जीवितहानीची झाल्याचे समजले नाही.
दरम्यान, पुराच्या संभाव्य ठिकाणाहून लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. ही परिस्थिती लक्षात घेत येडियुरप्पा यांनी फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.