Sex For Marks: बिहार मध्ये पॅरा मेडिकल विद्यार्थ्यांकडे परीक्षेत पास करण्यासाठी डॉक्टरांची शरीरसुखाची मागणी

आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

sexual abuse representative image- photo credit - pixabay

बिहार मध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये पास करण्यासाठी पॅरा मेडिकल विद्यार्थ्यांकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात नोंदवलेल्या एफआयआर मध्ये Dr Bijendra Prasad, Dr Nirmal Kumar, Dr Ritesh, Dr Ajay यांच्यासह अजून एकाचे नाव आहे. हा प्रकार Bhagwan Mahavir Institute of Medical Sciences (BMIMS) मधील असून 4 मेडिकाल प्रॅक्टशिनरचा यामध्ये समावेश असल्याची माहिती HT च्या वृत्तामध्ये दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 तक्रारदारांच्या तक्रारीवरून याबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी Dr Bijendra Prasad, Dr Nirmal Kumar, Dr Ritesh, Dr Ajay आणि अजून एका व्यक्तीने शरीरसुखाची मागणी केली. गुरुवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बीएमआयएमएस आवारात आलेल्या नालंदा जिल्हा दंडाधिकारी (डीएम) सशांक कुमार यांच्यासमोर पॅरामेडिकल कर्मचार्‍यांनी आंदोलन केले तेव्हा ही बाब उघडकीस आली. आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

डीएमने तात्काळ बीएमआयएमएसचे प्राचार्य डॉ अशोक कुमार सिंग यांना या आरोपाची चौकशी करण्यासाठी लैंगिक छळ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पवापुरी पोलीस चौकीत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. Rape Accused Throws Acid At Girl: बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीवर फेकले अॅसिड; नंतर स्वतः प्यायले, 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू .

भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यात महिलेचा विनयभंग (कलम 354), लैंगिक छळ (354 ए), स्टॉकिंग (354 डी) आणि 509 (महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने कृत्य) यासह मारहाण या गुन्ह्यांच्या कलमांना समाविष्ट करण्यात आले आहे.