Bihar Assembly Election Results 2020: निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in वेबसाईटवर विजेत्यांची नावे कशी पाहाल?

सत्ताधारी जेडीयू आणि भाजपला मतदार पुन्हा संधी देतात का? की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे राजद आणि काँग्रेस यांची महाआघाडी यांच्या हाती सत्ता जाते, हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

Bihar Election Result 2020 | File Image

तीन टप्प्यात पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आजपासून सुरुवात झाली आहे. 243 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 71, दुसऱ्या टप्प्यात 94 आणि तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची महाआघाडी यांच्यात लढत झाली. त्यामुळे सत्ताधारी जेडीयू आणि भाजपला मतदार पुन्हा संधी देतात का? की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे राजद आणि काँग्रेस यांची महाआघाडी यांच्या हाती सत्ता जाते, हे आज संध्याकाळपर्यंत  स्पष्ट होईल.

दरम्यान, निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही विजेत्यांची नावे पाहु शकता. त्यासाठी अधिकृत वेबसाईट www.eciresults.nic.in ला भेट द्या. वेबसाईटवरील  वर तुम्हाला निवडणुक उमेदवार, पक्ष, विजेते यासंबंधित सर्व माहिती मिळेल. (बिहार निवडणुकीचे अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेबसाईटवरील  वर तुम्हाला निवडणुक उमेदवार, पक्ष, विजेते यासंबंधित सर्व माहिती मिळेल. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी नंतर तेथील विजयी उमेदवाराचे नाव आणि किती मतांनी विजयी झाला, याची माहिती वेबसाईटवर मिळेल. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या अॅपवर देखील तुम्ही निकाल पाहु शकता. त्यासाठी तुम्हाला ‘ECI’s Voter Helpline’ अॅप डाऊनलोड करावा लागेल. हा अॅप अॅनरॉईड आणि आयओएस युजर्स दोघेही वापरु शकतात. हा अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती भरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. मात्र तुम्ही ते स्किप करुन होमपेजवर जाऊ शकता. होमजेपवर तुम्हाला 'results' हा पर्याय दिसेल. तेथे तुम्ही बिहार निवडणुकीचा निकाल पाहु शकाल. दरम्यान, निवडणुक आयोगाने राज्यातील 38 जिल्ह्यांमध्ये तब्बल 55 मतमोजणी केंद्र उभारली आहेत. बिहार निवडणूकीत तब्बल 3,755 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

2015 मध्ये 243 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. त्यात राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर भाजप प्रणित एनडीएला 58 जागांवर यश मिळाले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif