31 डिसेंबर पूर्वी उरकून घ्या 'ही' महत्वाची कामे अन्यथा होईल नुकसान

परंतु पैशांसंबंधित काही महत्वाची कामे सुद्धा 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे. जसे आयटी रिटर्न किंवा आयटीआर फाइलिंग, आधार-पीएफ लिंक, पेशन्शधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र जमा करणे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

नवं वर्ष सुरु होण्यासाठी फक्त अवघे काही दिवस शिल्लक आहे. परंतु पैशांसंबंधित काही महत्वाची कामे सुद्धा 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे. जसे आयटी रिटर्न किंवा आयटीआर फाइलिंग, आधार-पीएफ लिंक, पेशन्शधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र जमा  करणे. जर 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही हे काम केले नसाल तर काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे.(Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा व्यावसायिक विमान कंपन्यांना फटका, वीकेंडमध्ये 4,500 हून अधिक उड्डाणे रद्द)

>>आयकर रिटर्न फाइल (Income Tax Return)

आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न फाइल करण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आला होता. सरकारने नव्या इन्कम टॅक्स पोर्टवर येणारी समस्या आणि कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे कालावधी वाढवला होता. मात्र आता 31 डिसेंबर पर्यंत करदात्यांना ITR भरावा लागणार आहे. जेणेकरून दंड भरावा लागणार नाही.

>>आधार UAN ला लिंक करणे

कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) ग्राहकांना UAN क्रमांक आधार कार्डला लिंक करावे लागणार आहे. UAN आधार कार्डला लिंक करण्याची अखेरची तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे तुम्ही हे काम न केल्यास तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा उमंग अॅपच्या माध्यमातून लिंक करु शकतात.

>>जीवन प्रमाण प्रमाण पत्र (Life Certificate) 

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेन्शन येत असल्यास तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागणार आहे. परंतु असे न केल्यास येणाऱ्या दिवसात तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. याची अंतिम तारीख यापूर्वी 30 नोव्हेंबर होती जी वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आहे.

>>डिमेट, ट्रेडिंग अकाउंटची KYC

जर तुम्ही डीमेट आणि ट्रेडिंग अकाउंट वापर असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण SEBI ने डीमेट आणि ट्रेडिंग खात्याची अखेरची तारीख 30 सप्टेंबर होती. परंतु ती वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली. डीमेट, ट्रेडिंग अकाउंटमध्ये KYC अंतर्गत नाव, पत्ता, PAN, वॅलिड मोबाईल क्रमांकासह अन्य माहिती अपडेट करावी लागणार आहे.