Bear Price Hike: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! बिअरच्या किमतीत दरवाढ, बिअर खरेदीसाठी आता मोजावे लागणार अधिक शुल्क
लाइट बिअरच्या प्रति लिटरमागे १५ रुपये तर स्ट्रॉंग बिअर प्रती लिटरमागे २०-२५ रुपयांची वाढ झाली आहे, असं मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्षांनी म्हटलं आहे.
बिअर फॅन्सची (Bear Fans) संख्या मोठी आहे. बिअर हा मद्य प्रकारांपैकी सगळ्यात सोयिस्कर प्रयार मद्यप्रेंमी वाटतो. पण आता याचं बिअरच्या किमतीत मात्र वाढ होणार आहे. मी दारु पीत नाही पण बिअर पितो असं म्हणणारे अनेक बिअर चाहत्यांसाठी ही एक महत्वपूर्ण बातमी आहे. तरी बिअरच्या किमतीत वाढ ही महाराष्ट्रात नाही तर गोव्यात होणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मद्याची किंमत गोव्यात कमी आहे. म्हणून तळीराम गोव्यात ऐजॉय करण्यासाठी गोव्यात जातात पण आता गोव्यातही बिअरची किंमत वाढणार असल्याची असं मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्षांनी म्हटलं आहे. तरी राज्य सरकारने बिअरवरील अबकारी कर वाढवल्याने आता बीअरची किंमत १० ते १२ रुपये प्रती लिटरने वाढली आहे. या वाढीव अबकारी करांबाबतची घोषणा गोवा राज्य सरकारकडून दोन दिवसांपूर्वीचं करण्यात आली होती.
लाइट बिअरच्या (Light Bear) प्रति लिटरमागे 15 रुपये तर स्ट्रॉंग बिअर (Strong Bear) प्रती लिटरमागे 20-25 रुपयांची वाढ झाली आहे, असं मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्षांनी म्हटलं आहे. अबकारी कर वाढल्याने स्वस्त बिअर विक्री करणारे राज्य हे गोव्याचं (Goa) नाव आता मागे पडले आहे. विदेशी मद्य विक्रीबाबतही गोव्यातील अर्ध्याहून अधिक बाजारपेठ उत्तर भारतीय राज्यांत गेले आहे, अशी खंत इथल्या मद्य विक्रेत्यांनी केली आहे. (हे ही वाचा:- Amul Price Hike: सणासुदीतच्या काळात अमूलने वाढवले दुधाचे भाव; लिटरमागे 2 रुपयांची वाढ)
गोव्याचा समुद्र (Goa Sea) जेवढा प्रसिध्द आहे तेवढीचं गोव्याची दारु (Goa Liquor) पण आता या दारुवरील म्हणजे बिअरवरील कर वाढणार असतील तर मग मात्र अवघड आहे. त्यामुळे दिवाळी (Diwali) किंवा ख्रिसमसच्या सुट्ट्यांदरम्यान तुम्ही गोव्याला जायचा बेत आखत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी. कारण बिअरच्या वाढीव दरासोबतचं तुमच्या ट्रीपच्या बजेट नक्कीचं वाढू शकतो ही शक्यता नाकारता येणार नाही.