Assets of PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किती आहे संपत्ती? 22 लाख रुपयांच्या नफ्यासह पुढे आला नवा आकडा
यात संपत्तीत पाठीमागील वर्षी 2.85 कोटी रुपये ते 22 लाख रुपयांची वाढ (Narendra Modi Assets) झाली आहे. पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार नवा आकडा पुढे आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती (PM Narendra Modi Net Worth) 3.07 कोटी रुपये इतकी आहे. यात संपत्तीत पाठीमागील वर्षी 2.85 कोटी रुपये ते 22 लाख रुपयांची वाढ (Narendra Modi Assets) झाली आहे. पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार नवा आकडा पुढे आला आहे. आपल्या संपत्तीचे विवरण पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा त्यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांप्रमाणे शेअर बाजारात कोणत्याही प्रकारे गुंतवणूक (PMNarendra Modi Investments) नाही. पंतप्रधानांच्या असलेल्या गुंतवणुकीच्या तपशिलानुसा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) मध्ये 8.9 लाख रुपये, जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policies) मध्ये 1.5 लाख आणि एलएंडटी इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड (L&T infrastructure bonds) मध्ये काही गुंतवणूक केली आहे. जे त्यांनी 2012 मध्ये 20,000 रुपयांमध्ये खरेदी केले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या संपत्तीतील वाढ ही भारतीय स्टेट बैंक (State Bank of India) च्या गांधीनगर येथील शाखेत त्यांनी फिक्स्ड डिपॉजिट (Narendra Modi Bank Balance) मुळे झाली आहे. पंतप्रधानांनी स्वत:हून दिलेल्या माहितीनुसार (सेल्फ डिक्लरेशन) फिक्स्ड डिपॉझिटची रक्कम 31 मार्चला 1.86 कोटी रुपये इतकी झाली आहे जी पाठिमागील वर्षी 1.6 कोटी रुपये होती. (हेही वाचा, Congress Targets BJP: 'CM नहीं PM बदलो' मुख्यमंत्री बदलण्याने पंतप्रधानांचे अपयश झाकणार नाही; काँग्रेसची ट्विटरवर भाजप विरोधात मोहीम)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची नवी मालमत्ता खरेदी केली नाही. त्यांची एकमेवक स्थावर मालमत्ता त्यांनी 2002 मध्ये खरेदी केली होती. ज्याची किंमत 1.1 कोटी रुपये आहे. ही एक भागिदारीतील संपत्ती आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केवळ एक चतुर्थांश इतकाच हिस्सा आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे 14,125 चौरस फुट संपत्तीत मोदी यांचा हक्क केवळ 3,531 चौरस फुट इतकाच आहे.
दरम्यान, केंद्रात जेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत होते तेव्हा एक निर्णय घेण्यात आला होता. तो असा होता की, सार्वजनिक जीवनामध्ये अधिक पारदर्शकता यावी यासाठी सर्व केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दरवर्षी स्वत:हून जाहीर करावी. यात आपली संपत्ती, कर्ज आणि इतर बाबतींचीही माहिती असावी. तसेच, ही माहिती सार्वजनिक डोमेन वर ( Public Domain) उपलब्ध असावी. ही माहिती पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरुन घेता येते.