जम्म-काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात एक जवान शहीद, 2 जखमी
यात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत.
जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) च्या पुंछ (Poonch) भागात पाकिस्तानी (Pakistan) कडून बेशूट गोळीबार करण्यात आला. यात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. पुंछच्या वरिष्ठ पोलिस अधिक्षक (SSP) रमेश कुमार अनगरल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय जवान या गोळीबारात शहीद झाला आहे. लुंगबुई अबोनमली असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव होते. तर इतर दोनजण जखमी झाले असून त्यांना उद्धमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी (13 जून) देखील पाकिस्तानकडून भारतीय सैनेच्या चौक्यांवर निशाणा साधण्यात आला. परंतु, भारताकडून देखील याचे चोख उत्तर देण्यात आले. या चकमकीत एक भारतीय सैनिक शहीद झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने शनिवारी (13 जून) रात्री शाहपुर-केरनी सेक्टरमध्ये गोळीबार केला. यावर भारतीय सैन्याकडून चौख प्रत्त्युतर देण्यात आले. यात एक जवान शहीद झाला असून जखमी झालेल्या दोन जवानांवर उपचार सुरु आहेत.
ANI Tweet:
यापूर्वी गुरुवारी (11 जून) जम्मू-काश्मीरच्या एलओसी दरम्यान शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताने गोळीबार करत उत्तर दिले होते. ज्यात राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यांच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाले. तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.
यापूर्वी 4 जून रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून बेशूट गोळीबार करण्यात आला होता. यात हवलदार पी माथियाझगन शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा 10 जून रोजी अशा प्रकारची घटना घडली. त्यात नाईक गुरचरण सिंह शहीद झाले. सुमारे आठवड्याभरापासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून नियंत्रण रेषेच्या जवळून कोणत्याही कारणाशिवाय बेशूट गोळीबार केला जात असल्याची माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली आहे.