Karnataka: कर्नाटकमध्ये ‘अमूल’ दुधावर बहिष्कार टाकण्याचा हॉटेल व्यावसायिकांचा निर्णय
कर्नाटकात राजकीय वातावरण देखील सध्या चांगलेच तापले असून दुधाचा वरुन देखील राजकारण देखील चांगलेच तापले आहे.
कर्नाटक राज्यात लवकरत विधानसभेच्या निवडणुका (Karnataka Assembly Election) पार पडणार आहे. या निवडणुकापुर्वी कर्नाटकामध्ये 'अमूल दुध' (Amul Milk) आणि 'नंदिनी दुध' (Nandini Milk) यामध्ये वाद सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. कर्नाटकात 'अमूल'च्या प्रवेशावरुन या वादाला सुरुवात झाली होती. यानंतर राजकीय नेत्यांनी देखील या वादात उडी घेतली होती. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी अमूलच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. काहीच दिवसांपूर्वी दह्याच्या पाकिटावर हिंदीतून नाव लिहिण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दिले होते. त्यावरून दक्षिणेच्या राज्यांमध्ये वाद उफाळला होता, अखेर संबंधित निर्देश मागे घ्यावे लागले होते.
कर्नाटकात राजकीय वातावरण देखील सध्या चांगलेच तापले असून दुधाचा वरुन देखील राजकारण देखील चांगलेच तापले आहे. काँग्रेसने अमूलला प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. बोम्मई सरकारचा हा निर्णय म्हणजे कर्नाटक दूध संघाची प्रतिष्ठित नाममुद्रा असलेली ‘नंदिनी’ संस्था ‘अमूल’ला विकण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसनी केले आहे. कर्नाटकातील शेतकऱ्यांचे उत्पादन असलेले नंदिनी दुधाचा अभिमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान बृहद बंगळूरु हॉटेल संघटनेने राज्यातील (दूध उत्पादक) शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी केवळ ‘नंदिनी’ दूध वापरण्याची घोषणा केली. यामुळे ‘अमूल’ला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान कर्नाटकातील अमूल दुधाच्या विक्रीला विरोध करण्यासाठी आणि नंदिनी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक रक्षा वेदिकेने निषेध व्यक्त केला आहे.