काही वेळात परतणार विंग कमांडर अभिनंदन; सुरक्षिततेसाठी 'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम रद्द

संपूर्ण देशाचे लक्ष अभिनंदनच्या परतीकडे लागले आहे.

Wagah Border | (Photo Credit: PTI)

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेला विंग कमांडर अभिनंदन (IAF Pilot Abhinandan) लवकरच मायदेशात परतणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष अभिनंदनच्या परतीकडे लागले आहे. विंग कमांडरच्या स्वागतासाठी सकाळपासून अटारी बॉर्डरवर लोकांनी गर्दी केली आहे. तिरंगा फडकवत, घोषणाबाजी करत लोक अभिनंदनच्या परतण्याची वाट पाहत आहेत. यावेळेस वाघा बॉर्डरवर 'बीटिंग द रिट्रीट'चे (Beating the Retreat) आयोजन करण्यात येते. मात्र अभिनंदन परणार असल्याने सुरक्षिततेसाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विंग कमांडरच्या वडिलांचे भावुक वक्तव्य- 'अभिनंदन'च्या शौर्याचा अभिमान आहे; तो सुखरुप परत यावा हीच प्रार्थना

पाकिस्तानने अटारी बॉर्डरवर अभिनंदनला भारताच्या हवाली करणार असे सांगितले होते. मात्र भारताने अटीविना अभिनंदनची सुटका मागितली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेचा हवाला देत अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली होती.

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेवेळी सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असून सुरक्षा रक्षकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.