Mobile Tower Collapses In Delhi: दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे कोसळला 100 फूट उंच मोबाईल टॉवर (Watch Video)
दक्षिण दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये एक 100 फूट उंच मोबाईल टॉवर कोसळला. ब्लॉक बी 2 मधील रहिवाशांच्या मते, पहाटे 4 वाजता जोरदार वारे आणि पावसामुळे हा टॉवर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
Mobile Tower Collapses In Delhi: वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे दक्षिण दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये एक 100 फूट उंच मोबाईल टॉवर कोसळला (Mobile Tower Collapses). ब्लॉक बी 2 मधील रहिवाशांच्या मते, पहाटे 4 वाजता जोरदार वारे आणि पावसामुळे हा टॉवर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
या घटनेबद्दल बोलताना, स्थानिक रहिवासी मीनू कपूर यांनी सांगितले की, आमच्या घराच्या मागे पहाटे 4 वाजता टॉवर पडला. देवाची कृपा आहे की तो घरावर पडला नाही. अन्यथा, मोठा अनर्थ टळला असता. आम्ही सरकारला टॉवर काढून टाकण्याची विनंती करतो.' (हेही वाचा - Kedarnath Helicopter Crash: केदारनाथ मंदिराजवळ खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर अपघात; सर्व 7 जणांचा मृत्यू)
दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि टॉवरच्या स्थापनेबाबत रहिवाशांच्या वारंवार केलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अधिकाऱ्यांवर कडक टीका केली. हा टॉवर प्रचंड निषेध असूनही उभारण्यात आला. जर तो दिवसा किंवा निवासी बाजूने पडला असता तर होणारे नुकसान अकल्पनीय झाले असते, असे त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये सोमनाथ भारती यांनी म्हटले आहे.
भारती यांनी आरोप केला की, हा टॉवर बेकायदेशीरपणे निवासी क्षेत्रात बसवण्यात आला होता, तसेच एमसीडी, पोलिस आणि निवडून आलेल्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा अपील करण्यात आले होते, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मानवी वस्तीच्या ठिकाणी मोबाईल टॉवरला परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.