Nanded Shocker: नांदेड येथे दूषित पाणी पिल्याने 93 लोक रुग्णालयात दाखल, विहीर करण्यात आली सील
नांदेड जिल्ह्यातील मुगाव तांडा गावात विहिरीचे दूषित पाणी पिल्याने सुमारे 93 जणांची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. गावातील लहान मुलांसह वृद्धांना पिण्याच्या पाण्यामुळे संसर्ग झाला आहे. पीटीआयला माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे म्हणाले की, २६ आणि २७ जून रोजी लोकांनी पोटदुखी आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली होती.
Nanded Shocker: नांदेड जिल्ह्यातील मुगाव तांडा गावात विहिरीचे दूषित पाणी पिल्याने सुमारे 93 जणांची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. गावातील लहान मुलांसह वृद्धांना पिण्याच्या पाण्यामुळे संसर्ग झाला आहे. पीटीआयला माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे म्हणाले की, २६ आणि २७ जून रोजी लोकांनी पोटदुखी आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली होती. गावातील ९३ लोकांनी अशीच तक्रार केली. एकाच वेळी अनेक जण आजारी पडल्याने ग्रामस्थांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुगाव येथे ५६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ३७ रुग्णांना मांजरमला पाठवण्यात आले. जे बरे झाले आहेत त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
मुगाव येथे डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले .' आम्ही सर्वेक्षण केले आणि संसर्ग कोठून झाला हे शोधून काढले आणि गावातील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक विहीर असल्याचे आढळले. ती विहीर सील करण्यात आली आहे. यासोबतच गावातील लोकांना फिल्टर प्लांटद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement