Mumbai MHADA Lottery 2023: मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी काढणार सोडत, गोरेगाव येथे 2, 638 घरांचा प्रकल्प, जाणून घ्या, सविस्तर माहिती

मुंबईत घर असावे हे स्वप्न आता म्हाडामुळे पूर्ण होणार आहे. मुंबईत घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. दरम्यान, मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी सोडत काढणार आहे, जाणून घ्या, अधिक माहिती

Mumbai Mhada Lottery 2023

Mumbai MHADA Lottery 2023: मुंबईत घर असाव असे स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत घर असावे हे स्वप्न आता म्हाडामुळे पूर्ण होणार आहे. मुंबईत घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. दरम्यान, मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी सोडत काढणार आहे.  २०१९मध्ये मुंबईत म्हाडाची सोडत निघाली होती त्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर आता ही सोडत निघणार आहे.  एप्रिलमध्ये, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ घरांची सोडत निघण्याची दाट शक्यता आहे. मागील चार वर्षांपासून रखडलेली लॉटरी प्रक्रिया सुरळीत होण्याची शक्यता आहे.  सर्व गटातील घरांचा समावेश असणार आहे. गोरेगावसह कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणेसह अन्य ठिकाणाही म्हाडाच्या घराची सोडत निघणार आहे.

म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील म्हाडाच्या  दोन प्रकल्पांना या महिन्याअखेर OC Certificate मिळणार आहे.  गोरेगाव येथे  २, ६३८ घरांचा प्रकल्प आहे. गोरेगावमध्ये म्हाडाचे ए आणि बी प्रकल्प सध्या तयार होत आहेत. गोरेगाव येथे ३२२ चौरसवर्गाची १२३९ घरे आहेत. ईडब्लूएसच्या  गोरेगाव येथील घरांच्या किमती ३५ लाख इतकी असण्याची शक्यता आहे . तर, एलआयजीसाठी घरांची किमत  ४५ लाख रुपयांपर्यंत असू शकते. एमआयजी आणि एचआयजीसाठीची घरे अद्याप तयार होत आहेत. कोकण बोर्ड येथे  ४, ६६४ घरांसाठी १० मे रोजी लॉटरी जारी करण्यात येणार आहे. कोकण बोर्ड येथे  ४, ६६४ घरांसाठी 33 हजार इच्छुकांनी आत्ता पर्यंत रजिस्ट्रेशन केले आहे.



संबंधित बातम्या