Crime: क्रुरतेचा कळस! गरोदर सुनेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासूला अटक
तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील पोलिसांनी एका महिलेला तिच्या गर्भवती सुनेला जाळून टाकल्याच्या आरोपाखाली अटक केली.
तेलंगणातील (Telangana) कामारेड्डी (Kamareddy) जिल्ह्यातील पोलिसांनी एका महिलेला तिच्या गर्भवती सुनेला जाळून टाकल्याच्या (ablaze) आरोपाखाली अटक केली. कीर्तना 50 टक्क्यांहून अधिक भाजली होती. याआधी तिने चार महिन्यांची जुळी मुले गमावली होती आणि सध्या ती जीवनाशी लढत आहे, असे पोलिसांनी सांगितले. आंबव्वा, आरोपी आणि पीडितेचा पती कुरती पंढरी यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही घटना 17 जुलै रोजी सकाळी अचमपेट गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तना आणि पंढरीचे प्रेम झाले आणि त्यांनी 2021 मध्ये लग्न केले.
कीर्तनाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, सासरच्या लोकांकडून तिचा सतत छळ केला जात होता. जरी ते एकाच गावाचे आणि जातीचे असले तरी, अंबव्वा आणि कीर्तना कथितपणे सुरुवातीपासूनच जुळले नाहीत. दोघांमधील वाद वाढल्याने, सहा महिन्यांपूर्वी कीर्तना आणि तिच्या पतीने कामासाठी हैदराबादला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला, अधिकाऱ्यांनी खुलासा केला की, घटना घडली तेव्हा ते पंढरीच्या कुटुंबाला भेट देत होते. हेही वाचा Crime: प्रेयसीसोबत रिलेशनशीप कायम ठेवायची असल्याने मित्रांच्या मदतीने तिच्या घरी टाकला दरोडा, आर्थिकदृष्ट्या प्रियकरावर अवलंबून राहावी यासाठी केला गुन्हा
17 जुलै रोजी सकाळी 8 च्या सुमारास, अंबव्वाने कीर्तना किचनमध्ये काम करत असताना तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला कथितरित्या आग लावली. पोलिसांनी सांगितले की, तिच्या किंकाळ्या ऐकून कुटुंबातील इतर सदस्य आणि शेजारी स्वयंपाकघरात धावले आणि त्यांनी आग विझवली. तिला निजामाबाद येथील रुग्णालयात नेण्यात आले. जेथे तिचा गर्भपात करावा लागला. त्यानंतर तिला चांगल्या उपचारासाठी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
आंबव्वाला सोमवारी अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पतीवर (पंढरी) घरगुती हिंसाचाराचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात त्याची भूमिका स्पष्ट नाही. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, असे निजामसागर एसआय राजू यांनी सांगितले.