Mother Dairy Milk Price: सर्वसामान्यांना आणखी एक झटका! अमूल नंतर आता मदर डेअरीनेही वाढवली दुधाची किंमत, जाणून घ्या नवीन दर

पेट्रोल आणि डिझेलसह आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांना आता महागाईचा आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे.

Mother Dairy (Photo Credit: Twitter)

पेट्रोल आणि डिझेलसह आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांना आता महागाईचा आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे. कारण, अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) आपल्या दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मदर डेअरी रविवारीपासून (11 जुलै) दिल्ली-एनसीआरसह देशातील अन्य शहरांमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये वाढ करणार आहे. यामुळे उद्यापासून दूध खरेदी करताना सर्वसामान्यांना अधिक 2 रुपये मोजावे लागणार आहे.

एका अधिकृत निवेदनानुसार, 11 जुलै 2021 पासून मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये आपल्या द्रव दुधाच्या किंमतीत 2 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे. नवीन किंमती सर्व प्रकारच्या दुधासाठी लागू होतील. सुमारे दीड वर्षापूर्वी, डिसेंबर 2019 मध्ये दुधाच्या किंमती अखेरच्या वेळी बदलल्या गेल्या. यापूर्वी, अमूल ब्रँडखालील दूध व दुग्ध उत्पादनांची विक्री करणारी गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (जीसीएमएमएफ) ने दिल्ली-एनसीआर तसेच गुजरातमधील अहमदाबाद व सौराष्ट्रातील दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपये वाढ होणार असल्याचे जाहीर केले आहे. हे देखील वाचा- Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल च्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

एएनआयचे ट्वीट-

जीसीएमएमएफने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रतिलिटर 2 रुपये वाढ केल्याने एमआरपी (जास्तीत जास्त किरकोळ किंमत) मध्ये चार टक्के वाढ होते. ही वाढ सरासरी अन्न महागाईपेक्षा कमी आहे. सहकारी कंपनीचे म्हणणे आहे की ग्राहकांकडून मिळणार्‍या प्रत्येक रुपयापैकी 80 पैसे दूध उत्पादकांपर्यंत पोहोचतात. या वाढीमुळे दुग्ध उत्पादनांना मोबदला देण्यास मदत होईल आणि त्यांना दुधाचे उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहित केले जाईल.