Ludhiana Rape: 38 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी जिम मालकाविरोधात गुन्हा दाखल

देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच पंजाबच्या (Panjab) लुधियाना (Ludhiana) येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

देशात महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाहीत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच पंजाबच्या (Panjab) लुधियाना (Ludhiana) येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हेतर या घटनेचा अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी जिम मालकाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, धर्मिंदर कुमार सनी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जस्सीयन रोड येथे जिम चालवतो. तर पीडित महिला 2015 साली आरोपीच्या जिममध्ये जाईन केली होती. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला त्याच्या अन्य दुसऱ्या जिममध्ये जॉईन होण्यास सांगतले. एका दिवशी जिममध्ये कोणी नसताना शरीर तंदरुस्त ठेवण्याचा दावा करीत आरोपीने तिला काही गोळ्या आणि इंजेक्शन दिली. मात्र, या गोळ्या आणि इंजेक्शन घेतल्यानंतर पीडित बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर या घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. हे देखील वाचा- Madhya Pradesh Shocker: युवकाचा नदीत बुडून मृत्यू; गावकऱ्यांनी झाडाला उलटे लटकावला मृतदेह, समोर आले धक्कादायक कारण

दरम्यान, 2018 साली आरोपीला जिमसाठी नवीन उपकरणे घ्यायचे होते. यासाठी त्याने पीडिताकडे 5 लाखांची मागणी केली. मात्र, जेव्हा बलात्कार पीडितेने त्याला पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपीने तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर महिलेने सनीला दोन लाख रुपये दिले. तसेच आरोपीने पीडित महिलेचे सोशल मीडिया अकाउंट देखील हॅक केल्याची माहिती मिळत आहे. यावर्षी मार्चमध्येही आरोपीने पाच लाख रुपयांची मागणी केली असता पीडिताने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने तिच्या मुलांना तिचा अश्लील व्हिडिओ पाठवला. तसेच तिच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली, असे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे दोनदा लग्न झाले असून त्याला 13 वर्षांचा मुलगा आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.