Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 40.32 टक्के मतदान; जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी आकडा

दुपारी 1 वाजेपर्यंत 40.32 टक्के मतदान झाले.

Photo Credit -X

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी नऊ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील 96 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. देशभरात दुपारी 1 वाजेपर्यंत 40.32 टक्के मतदान झाले. भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 51.87 टक्के मतदान झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी 23.575 टक्के मतदान झाले.

दरम्यान, मध्य प्रदेश मध्ये 48.52 टक्के मतदान झाले आहे. आंध्र प्रदेश मध्ये 40.26 टक्के, बिहार मध्ये 34.44 टक्के, झारखंड मध्ये 43.8 टक्के, ओडिशा मध्ये 39.30 टक्के, महाराष्ट्रामध्ये 30.85 टक्के, तेलंगणामध्ये 30.85 टक्के, उत्तर प्रदेश मध्ये 39.68 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी नऊ राज्यांसह एक केंद्रशासित प्रदेश मध्ये 96 मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

आंध्र प्रदेशमध्ये 25 मतदारसंघात मतदान होत आहे. ओडिशा मध्ये 28 मतदारसंघात मतदान सुरू आहे. तेलंगणात 17 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. उत्तर प्रदेश मध्ये 13 मतदारसंघात मतदान सुरू आहे. महाराष्ट्रत 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी आठ मतदारसंघात मतदान सुरू आहे. बिहारमध्ये पाच, झारखंडमध्ये प्रत्येकी चार मतदारसंघात मतदान सुरू आहे. ओडिशा, जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मतदार संधात मतदान सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत आत्तापर्यंत 283 लोकसभा जागांवर मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले आहे.



संबंधित बातम्या