Kolkata Rape Case Update: कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीकडून आई आणि बहिणीवर हिंसाचार, पत्नीचेही शारीरिक शोषण; पोलिसांसमोर कबुली

कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपी आरोपी संजय रॉय याने घरगुती हिसांचाराची कबुली दिली आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याचे आई, बहीण आणि पत्नी यांच्यासोबत हिंसक वर्तन असल्याची म्हटले आहे.

Kolkata Rape Case Update: कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीकडून आई आणि बहिणीवर हिंसाचार, पत्नीचेही शारीरिक शोषण; पोलिसांसमोर कबुली
Photo Credit- X

Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार प्रकरणातील (Kolkata Doctor Rape Murder Case) आरोपीने घरगुती हिसांचाराची कबुली दिली आहे. आरोपी संजय रॉय याने पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याचे आई, बहीण आणि पत्नी यांच्यासोबत हिंसक वर्तन असल्याची कबुली दिली आहे. त्याशिवाय, आरोपीच्या सासूने याआधी त्याच्याविरुद्ध कालीघाट पोलीस ठाण्यात पत्नीचे शारीरिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली होती ही माहितीही उघड झाली आहे. गेल्या आठवड्यात कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर बलात्काराची घटना घडली. त्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर रोज आरोपीविषयी अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. आरोपी हा पोर्नोग्राफीचा व्यासनी होता. (हेही वाचा:Kolkata Rape Case: '...अन्यथा डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू'- ममता बॅनर्जी )

दरम्यान संजय रॉय याला शनिवारी अटक करताच त्याने पोलिसांकडे फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. रॉय याच्यावर पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी बीएनएसच्या कलम 64 (बलात्कार) आणि 103 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल फोनवर चा मजकूर आढळला.मजकूर आतिशय त्रासदायक आणि हिंसक होता. मजकूर पाहून पोलिसांनीही त्याच्या मानसिक स्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय दबावामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलिसांना कडक इशारा देताना 'रविवार, 18 ऑगस्टपर्यंत या प्रकरणाचा छडा लावू शकले नाहीत तर तपास सीबीआयकडे वर्ग केला जाईल', असे म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2024 12:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).