Gulmarg Terror Attack: पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंटने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली; मृतांची संख्या 5

दहशतवादी संघटना, जैश-ए-मुहम्मद, पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून बोटपाथरी दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Photo Credit- X

Gulmarg Terror Attack: दहशतवादी संघटना, जैश-ए-मुहम्मद, पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून बोटपाथरी दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पीएएफएफने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यात बोटपाथरी भागातील घनदाट जंगलातून एक दहशतवादी लष्कराच्या वाहनावर गोळीबार करताना दिसत आहे. पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून बोटपाथरी येथीस दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (Ganderbal Terror Attack: गांदरबल दहशतवादी हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा कामगार ठार, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली हळहळ)

पीएएफएफने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यात बोटपाथरी भागातील घनदाट जंगलातून एक दहशतवादी लष्कराच्या वाहनावर रॉकेट गोळीबार करताना दिसत आहे. गुरुवारी गुलमर्गच्या बोटापथरी भागात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन सैनिक आणि दोन नागरीक असे चार जण जागीच ठार झाले होते. एका जखमी जवानाचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाल्याने शहीदांची संख्या पाच झाली आहे.

दहशतवाद्यांनी बोटापाथरी येथे लक्ष्य केलेल्या लष्कराच्या वाहनाच्या दिशेने एक रॉकेट डागले होते, परंतु ते उद्दिष्ट लक्ष्यावर आदळले नाही आणि कोणतेही नुकसान न होता वाहनाजवळ पडले.