Aadhaar Card Update: आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदलणे आणखी सोपे झाले, पोस्टमन घरी येऊन करणार अपडेट

प्रत्येक महत्वाच्या कामासाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. यासाठी आधार कार्डमधील संपूर्ण माहिती माहिती अपडेट असणे अतिशय महत्वाचे आहे.

Aadhaar Card (Image: PTI/File)

आधार कार्ड (Aadhar Card) हे भारताचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज (Important Document) आहे. प्रत्येक महत्वाच्या कामासाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. यासाठी आधार कार्डमधील संपूर्ण माहिती माहिती अपडेट असणे अतिशय महत्वाचे आहे. यातच यूआयडीएआयने आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक अपडेट (Mobile Number) करण्यासाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. यापुढे पोस्टमन घरी येऊन आपल्या आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक अपडेट करणार आहे. या सुविधेसाठी यूआयडीएआयने आयपीपीबीशी (India Post Payment Bank) करार केला आहे.

यूआयडीएआयची मोबाईल अपडेट सेवा पोस्ट ऑफीस, पोस्टमेन आणि ग्रामी डाक सेवकांच्या नेटवर्कद्वारे दिली जाणार आहे. ज्या ठिकाणी आजपर्यंत बॅंकिंग सेवा पोहचल्या नाहीत, अशा परिसरातील पोहोचण्यात मदत होणार आहे. तसेच डिजिटल विभाजनाची दरी कमी करण्यात मदत होईल, असे आयपीपीबीनेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे व्येंकटरमु यांनी निवेदनात म्हटले आहे. हे देखील वाचा- Bank Service Update: आजपासून बँकिग क्षेत्रात होणार 'हे' नवीन बदल

ट्वीट-

सध्या आयपीपीबी केवळ मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची सुविधा देत आहे. मात्र, लवकरच या सुविधांचा विस्तार केला जाऊ शकतो. 31 मार्च 2021 पर्यंत यूआडीएआयने आतापर्यंत जवळपास 129 कोटी नागरिकांना आधार क्रमांक जारी केले आहेत.