31 मे पर्यंत अकाऊंटमध्ये ठेवा 342 रुपये अन्यथा होईल लाखोंचे नुकसान
प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना यांचा लाभ घेण्यासाठी 31 मे पर्यंत अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) आणि प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) या योजनचे उपभोक्ता असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 31 मे पर्यंत तुमच्या अकाऊंटमध्ये 342 रुपये असणे गरजेचे आहे. अन्यथा पीएमजेजेबीवाय (PMJJBY) आणि पीएमएसबीवाय (PMSBY) अंतर्गत मिळाणारे तुमचे इन्शोरन्स रद्द केले जाईल. PMJJBY आणि PMSBY या दोन योजनांअंतर्गत एकूण 4 लाख रुपयांचा इन्शोरन्स दिला जातो.
PMJJBY अंतर्गत 55 वर्षापर्यंतच्या नागरिकांना लाईफ कव्हर इन्शोरन्स दिला जातो. तर कोणत्याही कारणास्तव संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाखांचे कव्हर मिळते. ही योजना दरवर्षी रिन्यू केली जाते. याचे वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. 18-50 या वयोगटातील व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते.
PMSBY योजनेअंतर्गत वीमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळतात. काही प्रमाणात अपंगत्व असल्यास 1 लाखांचे कव्हर मिळते. 18-70 वयोगटातील व्यक्ती या वीमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. याचे वार्षिक प्रीमियम 12 रुपये आहे.
या दोन्ही योजनेचा वार्षिक प्रीमियम मे महिन्याच्या शेवटी अकाऊंटमधून कट केला जातो. त्यामुळे दोन्ही योजनांचा मिळून एकूण 342 रुपये कट होतील. म्हणून 31 मे पर्यंत अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे गरजेचे आहे.