कोलकाता: 'The 42' ला भारतातील सर्वात उंच इमारतीचा मान
'द 42'ला भारतातील सर्वात उंच इमारतीचा किताब प्राप्त झाला.येत्या काळात कोलकातामध्ये पूर्ण होणार नवे प्रकल्प
कोलकाता: 'The 42' या इमारतीच्या 65 व्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होताच या वास्तूला भारतातील(India's Tallest Building) सर्वात उंच इमारतीचा 'किताब प्राप्त झाला आहे. चौरंघीच्या (जे एन) मार्गावर बांधलेल्या तब्बल 268 मीटर उंच 'The 42' ने उत्तर मुंबईतील एम्पेरिअल टॉवर्स (The Imperial Towers), सोबतच कोलकात्त्यामधील टाटा सेंटर (Tata Center), चॅटर्जी इंटरनॅशनल्स (Chatterjee International),एवरेस्ट हाऊस (Everest House) या उंच इमारतींना मागे टाकत कोलकात्याच्या आकाशावर अधिराज्य प्रस्थापित केले आहे. हुगळी नदी (Hoogly River)लगतच्या मैदानात उभ्या या इमारतीचं बांधकाम नुकतंच पूर्ण झालं आहे.
65 मजल्यांच्या या बिल्डिंगला यापूर्वी केवळ 61 मजल्यांच्या बांधकामाची परवानगी देण्यात आली होती यामुळे भारतातील सर्वात उंच इमारतींच्या यादीत 'The 42' ला दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले असते मात्र काही दिवसांनी अधिक 4 मजल्यांची परवानगी देण्यात आली, अशी माहिती 'The 42' प्रकल्पाच्या बांधकाम संघटनेतली अलकॉव्ह रिअल्टी कंपनीच्या ए.एन श्रॉफ यांनी दिली.
'The 42' पाठोपाठ अर्बाना हि कोलकातामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च इमारत असून याची उंची 167.6 मी इतकी आहे. या सोबतच फोरम ऍटमॉसफिअर (152 मीटर) व वेस्टीन (150 मीटर) या दोन इमारतींना तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. या शिवाय 100 मीटरहुन अधिक उंचीच्या जवळपास 13 इमारती कोलकात्त्यामध्ये असून यात साऊथ सिटी, ऍक्रोपॉलिस, आयटीसी रॉयल बंगाल या नावांचा समावेश होतो.
'The42' इमारतीचा फोटो
या इमारतींचे काम शेवटच्या टप्प्यात
येत्या काही काळात ई एम बायपास मार्गावरील तीन बांधकामांमुळे सायन्स सिटी जवळ देखील गगनचुंबी इमारती पाहायला मिळणार आहेत. त्यासोबतच आयडियल युनिक सेंटर या व्यावसायिक इमारतीचे काम ही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. बिल्डींग साधारण 167 मीटर पर्यंत उंच बांधली जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या मागोमाग तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवण्यासाठी ट्रम्प टॉवर्स या 38 मजली व 140 मीटर उंच इमारतीचे नाव सध्या चर्चेत आहे. 2021-22 पर्यंत हे बांधकाम पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जातंय.
या मॉडर्न बांधकामांमुळे येत्या काळात शहराला आंतरराष्ट्रीय ढंग येऊन जागतिक दर्जा प्राप्त होईल अशी आशा रिअल इस्टेट डेव्हलपर्स संघटनेचे अध्यक्ष हर्ष पटोडीया यांनी व्यक्त केली.