Paytm Payment Bank ला मिळाली रिजर्व्ह बँकेची मान्यता
रोख रक्कम बागळण्याऐवजी लोक ऑनलाईन पैसै ट्रान्सफर करण्यास प्राधान्य देतात.
आजकाल ऑनलाईन व्यवहाराची चलती आहे. रोख रक्कम बागळण्याऐवजी लोक ऑनलाईन पैसै ट्रान्सफर करण्यास प्राधान्य देतात. यासाठी paytm, google pay, phone pay यांसारखे अनेक पर्याय निवडले जातात. तुमच्या आमच्यासारख्या ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता पेटीएम पेमेंट बँकेला (Paytm Payment Bank) रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) अधिकृत परवानगी मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या मान्यतेमुळे पेटीएम पेमेंट्स बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी 'केवायसी' (KYC) सुरू ठेवून नवीन ग्राहक स्वीकारु शकतात.
युजर्स आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये बचत किंवा चालू खाते उघडू शकतात. प्रत्येक भारतीयांपर्यंत आमची बँकींग सेवा पोहचविण्याचा आमचा मानस आहे. डिजिटल व्यवहार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे. तसंच अधिकाधिक लोक त्याचा स्वीकार करतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था समावेशक होण्यास मदत होईल, असे पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश गुप्ता यांनी सांगितले.
पेटीएम पेमेंट बँकेकडून मिळणाऱ्या सुविधा
# पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना मोफत बँकिंग सेवा देण्यात येते.
# बचतीवर 4% व्याज दिले जाते.
# ग्राहकांना खात्यात एक लाख रुपये जमा करण्याची मुभा बँकेकडून देण्यात आली आहे.
# तसंच तुम्हाला व्हर्च्युअल पासबुक, डिजिटल डेबिट कार्डची सुविधा देण्यात येईल.
आरबीआयच्या या निर्णयानंतर आता ऑनलाईन व्यवहार अधिक सुकर होण्यास मदत होईल.