EPFO AI System वापरुन काढा PF; नव्या प्रणालीचा लाभ कसा घ्याल? घ्या जाणून
त्यासाटी आपला UAN एक्टिवेटेड असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले व्हेरीफाय आधार यूएएन सोबत लिंक असणे आवश्यक आहे. IFSC कोड सोबत बँक खाते यूएएन सोबत लिंक आसणे आवश्यका आहे.
कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) मध्ये असलेल्या आपल्या PF अकाऊंटवरुन पैसे काढणाऱ्या खातेधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने कोरोना व्हायरस संकट काळत ही संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात पीएफचे पैसे काढणे नागरिकांना सुलभ व्हावे यासाठी ईपीएफओ (EPFO) ने AI टेक्नोलॉजी (Artificial Intelligence) प्रणाली सुरु केली आहे. EPFO च्या नव्या प्रणालीनुसार एका आठवडाभरातच PF खातेधारकाचा क्लेम मंजूर केला जात आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, आतापर्यंत जवळपास 54 टक्के क्लेम ऑटो मोडच्या माध्यमातून निकाली काढण्यात आले आहेत.
लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंन्सींग पाळावे लागत असल्याने ईपीएफओ कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात आहे. तरीही EPFO ने COVID-19 संबंधीत प्रकरणातील पैसे कढणाऱ्यांसाठी केवळ ते पैसे 3 दिवसांत काढता येतील आणि नागरिकांना मदत मिळेल अशी योजना तयार केली आहे. ऑटोमेटेड सिस्टम वापरुन EPFO प्रतिदिन 80,000 पेक्षाही क्लेम निकाली काढल्याचा दावा करत आहे. तसेच, 270 कोटी रुपयांचा निधी PF खातेधारकांच्या खात्यात जमा केल्याचेही ईपीएफओने म्हटले आहे. (हेही वाचा, COVID-19 Outbreak चं कारण देत PF अकाऊंट मधून कसे काढाल पैसे? इथे पहा सविस्तर माहिती)
EPFO AI System वापरा PF काढा सोप्या पद्धतीने
आपल्या खात्यातील पीएफ रक्कम अत्यंत सोप्या पद्धतीने काढण्यासाठी सर्वात आधी EPFO अधिकृत वेबसाईट पर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर लॉगइन करा. वेबसाईट ओपन होताच आपल्या उजव्या बाजूस यूएन आणि पासवर्ड आणि कॅप्चा भरा. त्यानंतर साईन ईन वर क्लिक करा. ओपन झालेल्या पेजवर आपल्या डाव्या बाजूला कर्मचारी प्रोफाईल दिसेल. त्यावर मॅनेज टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊन मेन्यूवर केवायसी निवडा. पुढच्या पेजवर ऑनलाईन सेवेसाठी टॅबवर क्लिक करा. ड्रॉप डाऊन सूचीतून सी आणि 10डी) निवडा आपण मेंबर डिटेल्स इथे पाहू शकता. आता व्हेरीफाय करण्यासाठी 'YES' ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला आपल्या खात्याचे शेवटचे 4 अंक टाकावे लागतील. आता पुढच्या फॉर्मवर नंबर 31 निवडा. त्यानंतर आपल्याला इथे ‘I want to apply for’ लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर ‘Proceed for online claim’ वर क्लिक करा.
दरम्यान, ऑनलाईन क्लेम करताना काही अटीही आहेत. त्यासाटी आपला UAN एक्टिवेटेड असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले व्हेरीफाय आधार यूएएन सोबत लिंक असणे आवश्यक आहे. IFSC कोड सोबत बँक खाते यूएएन सोबत लिंक आसणे आवश्यका आहे.