Bank Holidays in November 2023: नोव्हेंबर महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँका; वाचा सुट्ट्यांची यादी

नोव्हेंबर महिन्यात बँका 15 दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी (दिवाळी 2023), गोवर्धन पूजा, छठ इत्यादी सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

Bank Holidays in November 2023 (PC - File Image)

Bank Holidays in November 2023: नोव्हेंबर महिना सुरू होण्यासाठी अगदी दोन-तीन दिवसाचा कालावधी बाकी आहे. भारतात सणांचा हंगाम सुरू आहे. अशा स्थितीत बँकांना सुट्ट्या असणार आहेत. नवीन महिना सुरू होण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. तुम्हालाही बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण करायचे असेल, तर खाली दिलेल्या नोव्हेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी नक्की वाचा...

इतके दिवस बंद राहणार बँका -

नोव्हेंबर महिन्यात बँका 15 दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी (दिवाळी 2023), गोवर्धन पूजा, छठ इत्यादी सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. RBI ने जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीतील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. (हेेही वाचा - Chandra Grahan 2023: आज वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार; पहा कसं, कधी, कुठे?)

नोव्हेंबर 2023 मध्ये या दिवशी बँका बंद राहणार -

  • 1 नोव्हेंबर 2023- कन्नड राज्योत्सव/कुट/करवा चौथमुळे बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
  • 5 नोव्हेंबर 2023- रविवारची सुट्टी
  • 10 नोव्हेंबर 2023- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
  • 11 नोव्हेंबर 2023- दुसरा शनिवार
  • 12 नोव्हेंबर 2023- रविवार
  • 13 नोव्हेंबर 2023- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळी मुळे आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना सुट्टी असेल.
  • 14 नोव्हेंबर 2023- अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी (बळी प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.
  • 15 नोव्हेंबर 2023- गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे भाई दूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीया मुळे बँका बंद राहतील.
  • 19 नोव्हेंबर 2023- रविवारची सुट्टी
  • 20 नोव्हेंबर 2023- पाटणा आणि रांचीमध्ये छठनिमित्त बँका बंद राहतील.
  • 23 नोव्हेंबर 2023- सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
  • 25 नोव्हेंबर 2023- चौथा शनिवार
  • 26 नोव्हेंबर 2023- रविवार
  • 27 नोव्हेंबर 2023- गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

    30 नोव्हेंबर 2023- कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

बँक बंद असल्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी थांबावे लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम मोबाइल किंवा नेट बँकिंगद्वारे पूर्ण करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement