भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीसह 7 क्रू मेंबर्सना घेतलं ताब्यात
पाकिस्तानी बोटीसह 7 क्रू मेंबर्सना भारतीय पाण्यातून पकडण्यात आले आहे. हे प्रकरण गुजरातमधील द्वारका येथील आहेे.
भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) मोठी कारवाई करत पाकिस्तानी बोट पकडली आहे. पाकिस्तानी बोटीसह 7 क्रू मेंबर्सना भारतीय पाण्यातून पकडण्यात आले आहे. हे प्रकरण गुजरातमधील द्वारका येथील आहेे. जेथे गुजरात एटीएसच्या गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली आहे. बोट ताब्यात घेतल्यानंतर ती काल रात्री ओखा येथे आणण्यात आली आहे. आज विविध एजन्सी बोटीची पाहणी करणार असून क्रू मेंबर्सकडे चौकशी केली जाणार आहे. याआधीही गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने कारवाई करत पाकिस्तानी बोट पकडली होती. ज्यात 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.
हे लोक मच्छीमार बोटीच्या नावाखाली अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे काम करत होते. गुजरातमधून असा प्रकार उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्येही गुजरातला लागून असलेल्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून 400 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.मच्छीमार बोटीच्या नावाखाली अंमली पदार्थांची तस्करी होत होती. ड्रग्जच्या या खेपासह, एटीएस गुजरातसह तटरक्षक दलाने 6 तस्करांनाही अटक केली.
पकडलेली बोट पाकिस्तानातील कराची येथे नोंदणीकृत असल्याची माहिती मिळाली आणि भारतीय तटरक्षक दलाने एटीएस गुजरातसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत ती पकडली, त्यावेळी ही बोट भारतीय सागरी हद्दीत सहा नॉटिकल मैल आत होती. ज्या वेळी हे ऑपरेशन करण्यात आले त्या वेळी हवामान खूपच खराब होते आणि खूप थंड वारे वाहत होते. हेही वाचा Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी बोटीनेही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तटरक्षक दलाने झटपट कारवाई करून तिला पकडले आणि दोन जहाजांच्या मदतीने ती गुजरातमधील जखाऊ बंदरात आणण्यात आली. बोटीतून पाच बॅगा जप्त करण्यात आल्या असून त्यात सुमारे 77 किलो हेरॉईन होते. पकडलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 400 कोटी आहे. तटरक्षक दल आणि एटीएस गुजरात अटक केलेल्या तस्करांची चौकशी करत आहेत.