Airlines Hoax Bomb Threat Calls: 2024 मध्ये भारतीय विमान कंपन्यांना तब्बल 994 बॉम्बच्या धमक्या प्राप्त; विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

ऑगस्ट 2022 ते 13 नोव्हेंबर 2024 दरम्यान अशा एकूण 1,143 धमक्या नोंदवल्या गेल्या.

Photo Credit- X

Airlines Hoax Bomb Threat Calls: भारतातील विमान कंपन्यांना 2024 मध्ये तब्बल 994 बॉम्बच्या धमकी दिल्याचा (Airlines Hoax Bomb Threat Calls) आकडा समोर आला आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी (27 नोव्हेंबर) संसदेत दिली. खासदार कार्तिकेय शर्मा यांनी विचारलेल्या विमान वाहकांनी नोंदवलेल्या बॉम्बच्या धमक्यांबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, (हेही वाचा: Hoax Bomb Threats To Airlines: प्रसिद्धीसाठी पंतप्रधान कार्यालय आणि विमानांना 100 हून अधिक बॉम्बच्या धमक्या; नागपुरातील 35 वर्षीय व्यक्तीला अटक)

जमा झालेल्या डेटा विषयी अधिक माहिती देताना मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले की, “ऑगस्ट ते डिसेंबर 2022 दरम्यान तब्बल 27 फसव्या बॉम्बच्या धमकीचे कॉल आले. 2023 मध्ये ही संख्या 122 पर्यंत वाढली. तर चालू वर्षात नोव्हेंबर 2024 च्या मध्यापर्यंत 994 कॉल्स नोंदवले गेले. अशा घटनांना तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकताना मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्यूरो (BCAS), विमान वाहतूक सुरक्षा नियामक, त्यांच्या बॉम्ब थ्रेट आकस्मिक योजना (BTCP) अंतर्गत मजबूत प्रोटोकॉल लागू केले आहेत.

“बॉम्ब थ्रेट आकस्मिक योजनेचा एक भाग म्हणून, प्रत्येक विमानतळावर एक नियुक्त बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी (BTAC) असते. ज्याला धोक्यांचे मूल्यांकन आणि निराकरण करण्याचे काम दिले जाते. बॉम्बच्या धमकीचे फोन फ्लाइट ऑपरेशन्समध्ये व्यत्यय आणतात. ज्यामुळे एअरलाइन्स, विमानतळ आणि इतर कामांवर परिणाम होतो,” असे मोहोळ म्हणाले.