IndiGo to Cut Ties with Turkish Airlines: भारताचा तुर्कीला आणखी एक झटका; इंडिगो टर्किश एअरलाइन्ससोबतचा करार रद्द होणार

हा करार आधी 31 मे 2025 रोजी संपणार होता. परंतु प्रवाशांच्या सोयी लक्षात घेता, डीजीसीएने तो तीन महिन्यांसाठी वाढवला. तसेच स्पष्ट करण्यात आले की यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.

IndiGo to Cut Ties with Turkish Airlines: भारताचा तुर्कीला आणखी एक झटका; इंडिगो टर्किश एअरलाइन्ससोबतचा करार रद्द होणार
IndiGo | (Photo credit: archived, edited, representative image)

IndiGo to Cut Ties with Turkish Airlines: तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या अलीकडील पाठिंब्यामुळे आणि भारताच्या दहशतवादविरोधी उपाययोजनांवर केलेल्या टीकेमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले आहेत. या वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातही दिसून येत आहे. या भागात, भारतातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने (IndiGo Airlines) तुर्किश एअरलाइन्ससोबतचा (Turkish Airlines) करार 31 ऑगस्ट 2025 पर्यंत संपवण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी दिली.

इंडिगो सध्या तुर्की एअरलाइन्सकडून दोन बोईंग 777-370 ईआर विमाने भाड्याने घेऊन दिल्ली आणि मुंबई ते इस्तंबूल अशी उड्डाणे चालवत होती. हा करार मूळतः मे महिन्यात संपणार होता. म्हणजेच 31 मे 2025 रोजी संपणार होता. परंतु प्रवाशांच्या सोयी लक्षात घेता. डीजीसीएने तो तीन महिन्यांच्या एका वेळेच्या अंतिम कालावधीसाठी वाढवला. पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले.

इंडिगोने सहा महिन्यांची मुदत मागितली होती

इंडिगोने सरकारला हा करार आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्याची विनंती केली होती. परंतु डीजीसीएने तो फेटाळून लावला. प्रवासी सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. परंतु आता तो आणखी वाढवला जाणार नाही, असे डीजीसीएने स्पष्ट केले. हा निर्णय केवळ विमान वाहतूकपुरता मर्यादित नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताचे परराष्ट्र धोरण लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. बीसीएएस (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) ने अलीकडेच तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी देखील रद्द केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).