Jammu-Kashmir Update: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी नागरिकांना केले लक्ष्य, घरात घुसून 3 जणांवर गोळीबार
कुलगाममध्ये (Kulgam) बिगर काश्मिरींना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सांगितले जात आहे की ज्या लोकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला ते सर्व मजूर आहेत आणि तेथे काम करतात.
काश्मीरमध्ये (Kashmir) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी (Terrorists) भ्याड कृत्य केले आहे. कुलगाममध्ये (Kulgam) बिगर काश्मिरींना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सांगितले जात आहे की ज्या लोकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला ते सर्व मजूर आहेत आणि तेथे काम करतात. दहशतवाद्यांनी गोळीबार (Terrorist firing) केलेल्या तीन बिगर काश्मिरी मजुरांची ओळख राजा रेशी देव, जोगिंदर रेशी देव हे दोघे मजूर मृत झाले आहेत. तर चुंचुन रेशी देव हे जखमी आहेत. सर्व बिहारचे (Bihar) रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी या मजुरांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला आहे. संपूर्ण घटनेबाबत, जम्मू-काश्मीर पोलिसांकडून (Jammu Kashmir Police) असे म्हटले गेले आहे की कुलगामच्या (Kulgam) वानपोह (Wanpoh) भागात दहशतवाद्यांनी बिगर स्थानिक मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला.
या दहशतवादी घटनेत 02 स्थानिक लोक ठार झाले आणि 01 जखमी झाले. जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बीएसएफने परिसराला घेराव घातला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईमुळे दहशतवादी भडकले आहेत. ते एकापाठोपाठ बिगर काश्मिरींना लक्ष्य करत आहेत. आदल्या दिवशीही दहशतवाद्यांनी पुलवामा आणि श्रीनगरमध्ये दोन लोकांची गोळ्या घालून हत्या केली.
या घटनेनंतर पुन्हा एकदा लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी अज्ञात दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. जम्मू -काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. हेही वाचा Diwali 2021: यंदा दिवाळीत फटाके महागणार; किंमती 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही दक्षिण काश्मीरमधील वानपोह, कुलगाम येथे झालेल्या बर्बर हल्ल्याचा निषेध करतो, ज्यामध्ये 2 बिगर स्थानिक लोकांनी आपला जीव गमावला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमच्या सहानुभूती त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना भरून न येणारे नुकसान सहन करण्याची हिंमत लाभो.