Heatwave Warning: भीषण उष्णतेची लाट, पश्चिम बंगालच्या कलाईकुंडामध्ये तापमान 47.2 अंश; ओडिशा आणि झारखंडमध्येही स्थिती वाईट

सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने ४७ अंशांचा टप्पा ओलांडल्याने देशभरात उन्हाचा तडाखा किती वाढत आहे, याचा अंदाज येतो. देशातील काही शहरांमध्ये पारा ४७ अंशांच्या पुढे गेला असून बहुतांश शहरांमध्ये पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याची परिस्थिती आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Heatwave Warning:देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने ४७ अंशांचा टप्पा ओलांडल्याने देशभरात उन्हाचा तडाखा किती वाढत आहे, याचा अंदाज येतो. देशातील काही शहरांमध्ये पारा ४७ अंशांच्या पुढे गेला असून बहुतांश शहरांमध्ये पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याची परिस्थिती आहे.

 हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (३० एप्रिल) पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येथील कमाल तापमान 47.2 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा 10.4 अंश सेल्सिअस जास्त आहे. झारखंडमधील बहरागोरा हे दुसरे सर्वात उष्ण ठिकाण होते, जेथे तापमान 47.1 अंश सेल्सिअस इतके मोजले गेले.
पाहा पोस्ट:

या राज्यांमध्येही उष्णतेमुळे स्थिती बिकट आहे ओडिशातील बारीपाडा येथे ४६.४ अंश सेल्सिअस तर बालासोरमध्ये ४६ अंश सेल्सिअस तापमान होते. गंगेच्या पश्चिम बंगाल, उप हिमालयीन पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, तेलंगणा, झारखंड, रायलसीमाचा बहुतांश भाग तीव्र उष्णतेच्या लाटेत अडकला आहे.

तीव्र उष्णता

हवामान खात्याने आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आज, गंगेच्या पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट होती. बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा आणि कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट दिसून आली.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

जारी हवामान खात्याने गंगेच्या पश्चिम बंगालच्या बहुतांश ठिकाणी, बिहार, झारखंड, ओडिशामधील काही ठिकाणी, रायलसीमा आणि सौराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे, तर उप-हिमालयी पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये किनारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तेलंगणा, केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक येथे ही उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.