Farmers Protest: शेतकऱ्यांचा आज दिल्लीत मोर्चा, पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

राष्ट्रीय राजधानीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर आणि रेल्वे आणि मेट्रो स्टेशन आणि बस स्टँडवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Delhi Police Farmers Protest | (Photo Courtesy: X)

Farmers Protest: शेतकरी पुन्हा एकदा आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रीय राजधानीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर आणि रेल्वे आणि मेट्रो स्टेशन आणि बस स्टँडवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तत्पूर्वी, शेतकऱ्यांनी बुधवारी आंदोलनासाठी दिल्ली गाठणार असल्याचे जाहीर केले. शेतकरी नेते तेजवीर सिंह म्हणाले की, आज म्हणजेच 6 मार्च रोजी संपूर्ण भारतातील शेतकरी दिल्लीतील जंतरमंतरकडे शांततेने मोर्चा काढणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमधील शेतकऱ्यांनी मार्चसाठी दिल्लीला जाण्याची पूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या घोषणेनुसार पंजाब आणि हरियाणा वगळता इतर राज्यातील शेतकरी 6 मार्चला शांततेत दिल्लीकडे मोर्चा काढणार आहेत.

पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही सिंगू आणि टिकरी सीमेवरील प्रवाशांसाठीचे अडथळे तात्पुरते दूर केले आहेत. "पोलीस आणि निमलष्करी दल अजूनही तेथे तैनात आहेत आणि (ते) चोवीस तास कडक पहारा ठेवतील." ते म्हणाले की, रेल्वे आणि मेट्रो स्टेशन आणि बस स्टँडवर अतिरिक्त पोलिस आणि निमलष्करी दल आधीच तैनात करण्यात आले आहे. कोणालाही कायद्याचे उल्लंघन करू दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले. ठिकठिकाणी तपास अधिक तीव्र करण्यात येणार असून शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशव्यापी रेल रोको आंदोलन

पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसह त्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १० मार्च रोजी चार तास देशव्यापी रेल रोको आंदोलनाची हाक दिली होती.