MU IDOL Admission 2023: मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल मधील प्रवेश प्रक्रियेला 15 जुलै पर्यंत मुदतवाढ

याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. लवकरच पालघर मध्येही विभागीय केंद्र सुरू होणार आहे.

Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

मुंबई विद्यापीठाच्या Institute of Distance and Open Learning (IDOL) अंतर्गत विविध कोर्ससाठी प्रवेश प्रक्रियेला आता 15 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी 30 जून पर्यंत मर्यादित असलेले प्रवेश आता पुढे 15 दिवस वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे अजूनही प्रवेश घेण्याची संधी आहे. https://mu.ac.in/distance-open-learning/ वर विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. बीए, बीएस्सी, एम ए सह अनेक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी देखील याद्वारा प्रवेश दिले जातात.

मुंबई विद्यापीठाच्या IDOL ची केंद्र चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे आहेत. याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. लवकरच पालघर मध्येही विभागीय केंद्र सुरू होणार आहे.

यूजीसीने 2023-24 या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र , एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा या तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही देखील सुरुवात झाली आहे. यामध्ये मानसशास्त्र विषयात बीए केलेले विद्यार्थीच केवळ मानसशास्त्रात एमए प्रवेशासाठी पात्र असतील, तर कोणत्याही शाखेतील पदवीधर इतर दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत.

​गेल्या वर्षी, 58,000 विद्यार्थ्यांनी IDOL मध्ये  21 अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला होता. IDOL मधील सर्व कोर्सेस हे UGC मार्गदर्शक तत्त्वांनुसार चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम (CBCS) सह सेमिस्टर पॅटर्नमध्ये आधारित आहेत. UGC ने IDOL ला जानेवारी 2026 पर्यंत (पाच वर्षांसाठी) मान्यता दिली आहे. यामध्ये MU ला NAAC ग्रेड A++ आणि 3.65 गुण मिळाले आहेत. ही मान्यता 20 अभ्यासक्रमांसाठी वैध आहे.