दहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

दहावी, बारावीला १७ नंबरचे फॉर्म भरुन बसणाऱ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

दहावी, बारावीची परीक्षा (Photo Credits: PTI)

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीला 17 नंबरचे फॉर्म भरुन बसणाऱ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या आशयाचे पत्रक शिक्षण मंडळाने जाहिर केले आहे. त्या पत्रकानुसार, पूर्वी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर होती. मात्र ती वाढवून 23 नोव्हेंबर करण्यात आली आहे.

3 नोव्हेंबरपूर्वी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारनंतर पावती (enrolment certificate) मिळेल. याबद्दलची माहिती ई-मेल आणि रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर पावती (enrolment certificate) खालील संकेतस्थळावर उपलब्ध होईल- http://form17.mh-ssc.ac.in

enrolment certificate मिळाल्यानंतर विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर असलेले फॉर्म्स भरु शकतात. हे फॉर्म्स तुम्हाला या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.majasscboard.in

विद्यार्थी परीक्षेचे फॉर्म्स 23 नोव्हेंबर पर्यंत ठरवून दिलेल्या फी मध्ये भरु शकतात. 24-28 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्यास उपलब्ध राहतील. मात्र त्यासाठी तुम्हाला लेट फीज भरावी लागेल.